कायनेटीक ग्रीनच्या 3 इलेक्ट्रीक स्कूटर्स होणार लाँच
नवी दिल्ली :
इलेक्ट्रीक वाहन निर्माता कंपनी कायनेटीक ग्रीन यांनी आपला व्यवसाय वाढवण्यावर भर देण्याचे निश्चित केले आहे. आगामी काळात कंपनी आपल्या तीन नव्या इ स्कूटर्स लाँच करणार आहे. या स्कूटर्स येत्या 18 महिन्यात लाँच केल्या जाणार आहेत. यावर्षी उत्सवी काळात नव्या दुचाकींचे सादरीकरण केले जाईल. पुण्यात स्थित असलेल्या कंपनीने सदरची माहिती दिली आहे. कायनेटीक ग्रीन यांनी इटलीतील टोरीनो डिझाइनसोबत भागीदारी केली असून विविध वैशिष्ट्यांसहच्या स्कूटर्स विकसित करण्यात आल्या आहेत. कंपनीने जवळपास 80 हजार इतक्या इलेक्ट्रीक दुचाकी पहिल्या टप्यात विकल्या आहेत. देशात कंपनीचे 400 हून अधिक विक्रेते आहेत.
कंपनीच्या संस्थापक व सीईओ सुलज्ज फिरोदिया मोटवानी म्हणाल्या की चांगल्या पायाभूत सुविधांसह सुसज्ज निर्मिती क्षमता कंपनीची आहे. इलेक्ट्रीक दुचाकीच्या व्यवसायाच्या विस्तारावर यापुढे भर दिला जाणार आहे.
कायनेटीक ग्रीनची इलेक्ट्रीक वाहनांची सुरुवात 2016 मध्ये तीनचाकी वाहनापासून झाली आहे. 2022 मध्ये दुचाकी क्षेत्रात येत 2024 मध्ये इ लुना सादर केली आहे.