किम शर्मा लवकरच करू शकते दुसरा विवाह
लियांडर पेससोबत करतेय डेटिंग
मागील काही काळापासून बॉलिवूड अभिनेत्री किम शर्मा आणि टेनिस स्टार लियांडर पेस यांच्यातील अफेयर चर्चेत राहिले आहे. दोघांनाही अनेकदा रोमँटिक डेट्स आणि हॉलिडेवर एकत्र पाहिले गेले आहे. मागील वर्षी नववर्षापूर्वी दोघांनीही परस्परांच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. किम आणि लियांडर लवकरच स्वतःचे प्रेमसंबंध विवाहात बदलणार असल्याचे मानले जात आहे.
हे जोडपे लवकरच कोर्ट मॅरिज करू शकते. दोघांच्या पालकांनीच याकरता पुढाकार घेतल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु अद्याप अधिकृतपणे काहीच समोर आलेले नाही. मार्च महिन्यात किम आणि लियांडर यांच्या रिलेशनशिपला एक वर्ष पूर्ण झाले आहे. यानिमित्त किमने लियांडरसोबतची स्वतःची अनेक छायाचित्रे आणि चित्रफिती सोशल मीडियावर शेअर केल्या होत्या.
किमचा असणार दुसरा विवाह मागील वर्षी सप्टेंबरमध्ये दोघांनी इन्स्टाग्रामवर स्वतःच्या रिलेशनशिपची घोषणा केली होती. तेव्हापासूनच दोघेही सोशल मीडियावर परस्परांची छायाचित्रे शेअर करत आहेत. किम यापूर्वी हर्षवर्धन राणेला डेट करत होती. किमने 2010 मध्ये एनआरआय उद्योजक अली पुंजानीसोबत विवाह केला होता. परंतु त्यांचा आता घटस्फोट झाला आहे.