For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

किम कार्दशियनला ब्रेन एन्यूरिज्म

06:45 AM Nov 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
किम कार्दशियनला ब्रेन एन्यूरिज्म
Advertisement

गंभीर आजाराला तोंड देतेय मॉडेल

Advertisement

अत्यंत प्रसिद्ध अमेरिकन टीव्ही पर्सनॅलिटी किम कार्दशियनने स्वत:च्या आरोग्यावरून चकित करणारा खुलासा केला आहे. ‘द कार्दशियन्स’ या स्वत:च्या रियॅलिटी सीरिजच्या नव्या सीझनच्या टीजरमध्ये किम एमआरआय स्पॅनरकडे जाताना दाखविण्यात आली आहे. त्यानंतर स्वत:ला एन्यूरिज्म असल्याचे ती परिवाराला सांगताना दिसते. डॉक्टरने एन्यूरिज्मचे कारण तणाव असल्याचे सांगितल्याचा दावा किमने केला आहे. सध्या मी अनेक प्रकारच्या दबावाला सामोरे जात असून यात माझे कायद्याचे शिक्षणही सामील असल्याचे ती सांगते. किम यात पूर्वाश्रमीचा पती कान्ये ये वेस्टचाही उल्लेख करते, कान्येला किमपासून 4 अपत्यं आहेत. कान्येसोबतचे नाते संपुष्टात आले याचा आनंद आहे, परंतु काहीही असले तरी पूर्वाश्रमीचा पती माझ्या जीवनात राहिल, आम्हाला चार अपत्यं आहेत असे किम म्हणत असल्याचे दिसून येते. ब्रेन एन्यूरिज्मचा अर्थ मेंदूच्या रक्तवाहिनीत फुग्यासारखा भाग तयार होणे आहे. बहुतांश ब्रेन एन्यूरिज्म छोटे  असतात आणि गंभीर नसतात. यातील अनेक फुटत नाहीत नाही. परंतु एन्यूरिज्म लीक झाल्यास किंवा फुटल्यास मेंदूत रक्तस्राव होऊ शकतो.

Advertisement

Advertisement

.