लुईससोबत रिलेशनशिपमध्ये किम कार्दशियन
प्रसिद्ध हॉलिवूड सेलिब्रिटी किम कार्दशियन आणि फॉर्म्युला वन चॅम्पियन लुईस हॅमिल्टन यांच्या रिलेशनशिपबद्दल कयास दीर्घकाळापासून वर्तविले जात होते. दोघांनाही अनेकदा एकत्र पाहिले गेले होते. परंतु आता किमने इन्स्टाग्रामवर फॅमिली, फ्रेंड्ससोबतची काही छायाचित्रे पोस्ट केली असून यात लुईस देखील दिसून येत आहे.
किम कार्दशियनने लुईससोबतचे जे छायाचित्र पोस्ट केले आहे, त्यात दोघांमधील जवळीक स्पष्टपणे दिसून येते. दोघेही एका जोडप्याप्रमाणे फोटो क्लिक करवून घेत आहेत. तसेच किमचा छोटा मुलगाही यात दिसून येतो. अन्य छायाचित्रांमध्ये किमचे मित्र असून जे तिच्यासोबत गेट-टुगेटरचा आनंद घेत आहेत. फेब्रुवारी 2015 मध्ये गायिका निकोल शर्जिंगरसोबतचे लुईसचे नाते संपुष्टात आले होते. मग 2021 मध्ये किम कार्दशियनने देखील गायक कान्ये वेस्टपासून घटस्फोट घेतला होता. लुईस आणि किम यांच्यातील मैत्री अत्यंत जुनी आहे, परंतु चालू वर्षात दोघेही रिलेशनशिपमध्ये आल्याची चर्चा जोर पकडू लागली होती. दोघांनाही इंग्लंड तसेच पॅरिसमध्ये एकत्र पाहिले गेले हेते. दोघांनीही पॅरिसमध्ये रोमँटिक व्हेकेशन घालविली होती.