For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

घटस्फोटानंतर किमला मिळाले नवे प्रेम

06:46 AM Feb 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
घटस्फोटानंतर किमला मिळाले नवे प्रेम
Advertisement

पॅरिसमध्ये प्रियकरासोबत झाली स्पॉट

Advertisement

किम कार्दशियन आणि लुईस हॅमिल्टन परस्परांना डेट करत असल्याच्या चर्चेदरम्यान दोघेही पॅरिसमध्ये एकत्र दिसून आले आहेत. त्यांचा पॅरिस दौरा इंग्लंडमध्ये एकत्र हिंडल्याच्या काही दिवसांनी झाला असून यामुळे त्यांच्या रोमान्साची चर्चा सुरु झाली आहे. पॅरिसच्या एका हॉटेलमधील त्यांची एकत्रित छायाचित्रे व्हायरल झाली आहेत.

डेटिंगच्या चर्चेदरम्यान त्यांचे हे पहिले पब्लिक आउटिंग असल्याने चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. समोर आलेल्या छायाचित्रांमध्sय कार्दशियन आणि हॅमिल्टन पॅरिसमध्ये एकत्र स्पॉट करण्यात आले, परंतु दोघेही लो प्रोफाइल राहण्याचा प्रयत्न करत होते. कार्दशियनने मोठे सनग्लासेस आणि ब्लॅक ट्रेंचकोट परिधान केला होता, तर हॅमिल्टन ऑल-ब्लॅक आउटफिटमध्ये ग्रे शॉलसोबत हॉटेलमध्ये जाताना दिसून आला.

Advertisement

दोघेही वीकेंडला कोट्सवोल्डमध्ये एस्टेल मॅनर येथे होते. प्रकाशित छायाचित्रांमध्ये कार्दशियनला एक ब्लॅक एसयूव्हीमधून बाहेर पडताना पाहिले गेले. रियलिटी स्टार आणि एंटरप्रेन्योर कार्दशियन आणि फॉर्म्युला वन वर्ल्ड चॅम्पियन हॅमिल्टन यांची मैत्री एक दशकापेक्षाही जुनी आहे. कार्दशियनने 2022 मध्ये कान्ये वेस्टपासून घटस्फोट घेतल्यापासून स्वत:च्या खासगी आयुष्याला बऱ्याचअंशी प्रायव्हेट ठेवले आहे. कार्दशियन घटस्फोटानंतर डेटिंगच्या वृत्तांपासून दूर राहिली आहे. यापूर्वी 2024 मध्ये तिचे नाव एनएफएल प्लेयर ओडेल बेकहम ज्युनियरसोबत जोडले गेले होते.

Advertisement
Tags :

.