For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

45 हजार कोटींची किलर पाणबुडी ! केंद्रसरकार खरेदीच्या विचारात

07:41 PM Jan 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
45 हजार कोटींची किलर पाणबुडी   केंद्रसरकार खरेदीच्या विचारात
Advertisement

वृत्तसंस्था/ बॉन, नवी दिल्ली

Advertisement

चीन आणि पाकिस्तानसोबत वाढत्या धोक्यादरम्यान भारत पी-75आय प्रकल्पाच्या अंतर्गत 45 हजार कोटी रुपयांमध्ये अत्याधुनिक किलर पाणबुडी खरेदी करु इच्छित आहे. भारतासोबत हा करार करण्यासाठी सध्या जर्मनी आणि स्पेन आघाडीवर आहेत. याचदरम्यान जर्मनीने पाणबुडीवरून मोठी ऑफर दिली आहे. दोन्ही सरकारांदरम्यान अत्याधुनिक पाणबुडी खरेदी करण्याचा व्यवहार व्हावा असे जर्मन सरकारने म्हटले आहे. दोन्ही देशांदरम्यान यासंबंधी चर्चाही झाली आहे. जर्मनीसोबत आणखी एक युरोपीय देश स्पेन देखील भारताला पाणबुडींची विक्री करू पाहत आहे. या पाणबुडी एआयपीने युक्त असून दीर्घकाळापर्यंत समुद्रात लपून राहण्यास सक्षम आहेत.

जर्मनीचे संरक्षणमंत्री बोरिस पिस्तोरियस हे जून महिन्यात भारत दौऱ्यावर आले हेते आणि त्यांनी स्वत:च्या देशाच्या पाणबुडीकरता लॉबिंग केले होते. ही पाणबुडी जर्मनीच्या टीकेएमएस या कंपनीने निर्माण केली आहे. तर स्पेनची कंपनी नेवंतियाने भारताच्या एल अँड टीसोबत पाणबुडी करारासाठी हातमिळवणी केली आहे. तांत्रिक दृष्ट्या केवळ जर्मनी आणि स्पेनची पाणबुडी भारताच्या पी-75आय प्रकल्पासाठी योग्य ठरल्या आहेत.

Advertisement

स्पेनकडूनही ऑफर

स्पेन स्वत:च्या एस80 क्लासच्या पाणबुडीच्या आधारावर भारतासाठी डिझाइन तयार करणार आहे. एस80 पाणबुडीची निर्मिती सर्वप्रथम 2021 मध्ये करण्यात आली होती. 2023 मध्ये ही पाणबुडी स्पेनच्या नौदलाच्या ताफ्यात सामील झाली आहे. स्पेन आणि जर्मनी या दोन्ही देशांकडून प्राप्त ऑफरवर सध्या भारताकडून विचार सुरू आहे.

विशिष्ट तंत्रज्ञानाची मागणी

भारताने जर्मनीला पाणबुडीच्या उपकरणांवरून परवान्यांसंबंधी नियम शिथिल करण्यास सांगितले आहे. जर्मनी अनेकदा निर्यात रोखत असल्याने भारताला त्यावर भरवसा ठेवणे अवघड ठरले आहे. 75आय प्रकल्पाच्या अंतर्गत भारत एअर इंडिपेंडेंट प्रपल्शन तंत्रज्ञानाने युक्त पाणबुडी खरेदी करू इच्छित आहे, हे तंत्रज्ञान यापूर्वीच चीन आणि पाकिस्तानकडे आहे. या तंत्रज्ञानाने युक्त पाणबुडी दीर्घकाळापर्यंत खोल समुद्रात लपून राहू शकते आणि शत्रूला याचा सुगावा लागत नाही.

Advertisement
Tags :

.