For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कार चालकाचे अपहरण : चैघांना अटक

11:27 AM Mar 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
कार चालकाचे अपहरण   चैघांना अटक
Advertisement

दोन कोटीची केली होती कुटुंबीयाकडे मागणी : सुखऊप सुटका : पोलिसांनी लावला 18 तासांत छडा

Advertisement

प्रतिनिधी /दांडेली

दांडेली येथील कार चालकाचे अपहरण करून त्याच्या कुटुंबीयांकडून 2 कोटी रुपयांची मागणी करणाऱ्या चौघा आरोपींच्या दांडेली-कारवार व भटकळ पोलिसांनी 18 तासांत मुसक्या आवळून गजाआड केले. अपहरण केलेल्या कार चालकाचे नाव भरत सुरेश गायकवाड (वय 27, वनश्रीनगर, दांडेली) असे असून पोलसांनी त्याची सुखरुप सुटका केली आहे. अपहरणाचे नाट्या शनिवारी दांडेली येथे घडले असून रविवारी चौघा आरोपींना भटकळ येथे अटक केली. याबाबत अधिक माहिती अशी की,  परशुराम यल्लाप्पा मेदार (वय 42, रा. वनश्रीनगर, दांडेली), विनायक उर्फ विनू उर्फ अप्या केंपण्णा कर्णिंग (वय 42, रा. केएचबी कॉलनी, हल्याळ), अब्दुलहनाम मोहम्मद जाफर (वय 32, रा. मदिना कॉलनी, मोहिद्दीन स्ट्रीट, 3 रा क्रॉस, भटकळ), कलगोंड तुकाराम सुरनाईक (वय 38, रा. अश्रप कॉलनी, गांधीनगर, दांडेली) यांनी शनिवारी दांडेलीतील टॅक्सीस्टँड येथे कार चालक भरत गायकवाड याच्याशी संपर्क साधला. आम्हाला मंगळूर येथे त्वरित जायचे आहे, असे सांगून भाडे ठरवून मंगळूरच्या दिशेने प्रवास सुरू केला.

Advertisement

सदर कार भटकळजवळ येताच चारीही आरोपींनी भरत यास बेदम मारहाण केली. त्यानंतर भरतच्या घरी फोन करून तुमच्या मुलाचे अपहरण केल्याचे सांगत मुलगा जिवंत पाहिजे असल्यास 2 कोटी रुपये आणून द्यावेत, अशी धमकी दिली. याबाबत भरतच्या वडिलांनी त्वरित दांडेली पोलीस ठाण्यास संपर्क करून घडलेली हकीकत सांगितली. पोलिसांनी 21/2024 कलम इ 63 व 384 आयपीसी अंतर्गत अपहरणाचा गुन्हा दाखल करून घेतला. जिल्हा पोलीस अधीक्षक विष्णुवर्धन एन., अॅडिशनल एसपी सी. टी. जयकुमार, डीवायएसपी एस. व्ही. गिरीश (कारवार) यांच्या मार्गदर्शनाखाली दांडेली सीपीआय भीमन्ना एम. सुरी यांच्या नेतृत्वाखाली पीएसआय रवींद्र बिरादार, पीएसआय आय. आर. ग•sकर, दांडेली पोलीस स्टाफ, भटकळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक चंदन गोपाळ व पोलीस स्टाफ यांनी कारवाई करत चौघा आरोपींना भटकळ येथून अटक करून दांडेली येथे आणले. रविवार दि. 17 रोजी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. यातील पाचवा आरोपी फरार आहे. या चौघा आरोपींकडून 35 हजार रुपये रोख रक्कम, चार मोबाईल व दोन कार जप्त करण्यात आल्या आहेत.

अपहरण नाट्या...

  • मंगळूरला जायचे आहे, असे सांगून कार चालकाचे अपहरण
  • कार भटकळजवळ येताच कार चालकास केली बेदम मारहाण
Advertisement
Tags :

.