दिवडमध्ये दहावीच्या विद्यार्थ्याचे अपहरण
म्हसवड :
15 वर्षीय संस्कार अंकुश लोखंडे यांची शाळा सुटल्यावर दिवड (ता. माण) या बस स्टॅप थांबला असताना म्हसवडवरुन दुपारी दीडच्या सुमारास एका मोटार सायकलवरुन आलेल्या दोघांनी चौकशीच्या नावाने अल्पवयीन मुलाचे अपहरण केल्याची घटना शनिवारी घडली. अपहृत संस्कारची अपहरणकर्त्यांकडून सुटका झाल्यावर तो कुटुंबाकडे सुखरुप पोहोचला. यानंतर अपहरणाची तक्रार स्वत: संस्कार लोखंडे याने म्हसवड पोलिसांत दिली असून रात्री उशिरापर्यंत या गुह्याची नोंद करण्याचे काम सुरू होते.
याबाबत संस्कार अंकुश लोखंडे यांनी सांगितलेली घटना याप्रमाणे शनिवारी नेहमी प्रमाणे मी दिवड हायस्कूलमध्ये इयत्ता 10 च्या वर्गात शिकत असून शनिवारी आर्धी शाळा होती त्यामुळे दुपारी एक वाजता शाळा सुटल्यावर मित्रा सोबत शाळेच्या बाहेर आलो. जो तो विद्यार्थी आपआपल्या सोईने जात होते. मला दिवड गावात कोण जाण्यासाठी भेटते का म्हणून रस्त्याच्या बाजूला उभा होतो. त्यावेळी सर्वजन गेले होते. मी एकटाच उभा असताना म्हसवडवरुन एक मोटार सायकलवरुन दोघे तोंडाला रुमाल बांधून आलेले माझ्या समोर थांबले व मला दिडवाघवाडी कोठे आहे हे विचारले. त्याच वेळी मागे बसलेल्याने एक रुमाल माझ्या तोंडावर ठेवताच माझी शुध्द हरपली व मी बेशुद्ध झालो. मला जाग आली त्यावेळी मी सांगली जिह्यातील विटा या गावाच्या नजिक माळावर पडलेले होतो. दूरवर वाहने जात असल्याचे लक्षात येताच मी रस्त्यावर आलो व विटा बसस्थानक विचारत स्टॅण्डवर गेलो. तेथील कंट्रोलर यांना दिवडच्या गाडीची चौकशी करत घडलेला प्रकार सांगितला. विटा कंट्रोलरने पोलिसांना बोलवले व त्या मुलाच्या घरी फोन करून तुमचा मुलगा विट्यामध्ये आहे त्यास म्हसवड विटा बसने पाठवत आहे असे सांगितल्यावर संस्कारच्या घरच्या व्यक्तींचा जीव भांड्यात पडला. घरातील सर्वजन व इतर मंडळी म्हसवड बसस्थानकावर गेली. बसमधून संस्कार यास घेऊन म्हसवड पोलीस ठाणे गाठून सदर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्याची रात्री उशिरापर्यंत सुरू होती.