For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

किदांबी श्रीकांत उपविजेता

06:12 AM Jun 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
किदांबी श्रीकांत उपविजेता
Advertisement

वृत्तसंस्था, फुलेरटन (अमेरिका)

Advertisement

येथे झालेल्या विश्व बॅडमिंटनच्या अमेरिकन खुल्या सुपर 300 आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदांबी श्रीकांतला पुरूष एकेरीत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. चीन तैपेईच्या सु लि यांगने पुरूष एकेरीचे जेतेपद मिळविले.

पुरुष एकेरीच्या झालेल्या अंतिम सामन्यात चीन तैपेईच्या लि यांगने 33 वर्षीय किदांबी श्रीकांतला 21-15, 16-21, 21-9 अशा तीन गेम्समधील चुरशीच्या लढतीत पराभव करत विजेतेपद पटकाविले. 2014 आणि 2017 या कालावधीत श्रीकांतने सुपर सिक्स सिरीजमधील सहा स्पर्धा जिंकल्या आहेत. रविवारचा या स्पर्धेतील अंतिम सामना सुमारे तासभर चालला होता. रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत श्रीकांतने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती तर मलेशिया मास्टर्स सुपर 500 स्पर्धेत तसेच गेल्या वर्षी झालेल्या सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय सुपर 300 स्पर्धेत उपविजेतेपद मिळविले होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.