For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हायलॉक हायड्रोटेक्निकमध्ये टीपीएमचा किक ऑफ

10:31 AM Feb 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
हायलॉक हायड्रोटेक्निकमध्ये टीपीएमचा किक ऑफ
Advertisement

अधिकाधिक गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी ‘टीपीएम’ संकल्पना अस्तित्वात

Advertisement

बेळगाव : वेगवेगळे उद्योग, व्यवसाय, औद्योगिक यंत्रणा, कारखाने यांनी आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये आणि कमीतकमी किंमतीमध्ये अधिकाधिक गुणवत्तापूर्ण उत्पादने उत्पादित करावीत आणि आपल्या कारखान्यातील सर्व मशीन्स बिघाडरहीत, अपघातरहीत, दोषरहीत असावीत, यासाठी ‘टीपीएम’ ही संकल्पना अस्तित्वात आली आहे. मच्छे औद्योगिक वसाहतीतील हायलॉक हायड्रोटेक्निक येथे शुक्रवारी टीपेएमचा किक ऑफ करण्यात आला. एका अर्थाने हा उद्योग समूह आता आपल्या कार्यप्रणालीत टीपीएमची काटेकोर अंमलबजावणी करणार असून, त्याची सुरुवातही झाली आहे. बेळगावमध्ये हायलॉकसह एक्स्पर्ट इंजिनिअर्स व प्रगती इंजिनिअरिंग यांच्या उद्योग समुहात हा किक ऑफ केला आहे. यानिमित्त हायलॉक येथे आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून कॉन्फेड्रेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रिजचे (सीआयआय) सल्लागार अतुल शेठ उपस्थित होते. व्यासपीठावर हायलॉकचे कार्यकारी संचालक दिलीप चिटणीस, पराग चिटणीस, कॉस्टिंग, प्लॅनिंगच्या मॅनेजर स्वप्ना चिटणीस, प्रगतीचे महेश भिरंगी, एक्स्पर्टचे विनायक लोकूर होते.

आव्हानांचा स्वीकार करून संधीचे सोने करा

Advertisement

अतुल शेठ म्हणाले, मोठ्या कंपन्यांना टीपीएम प्रणाली राबविणे सोपे आहे. तसेच एमएसएमई अंतर्गत असणाऱ्या कंपन्यांमध्ये ही प्रणाली राबविणे आवश्यक आहे. म्हणूनच आता टीपीएम राबविणाऱ्या कंपन्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून, आव्हानांचा स्वीकार करून संधीचे सोने करायला हवे. यानंतर गोपाळ देशपांडे यांनी हायलॉकमध्ये टीपीएम कशा पद्धतीने राबविण्यात आले आहे, याची माहिती स्लाईडच्या माध्यमातून दिली. स्वप्ना चिटणीस यांनी टीपीएममुळे अधिकाधिक गुणवत्तापूर्ण उत्पादन करून ग्राहकांचे समाधान करणे हे आव्हान आहे ते हायलॉक परिवार नक्कीच पेलेल असे सांगून दर महिन्याला प्रत्येक विभागाचे परीक्षण करून सर्वोत्कृष्ट विभागाला फिरता चषक देण्यात येणार असल्याचे जाहीर केले. सॅन्ड्रा रोझारिओ यांनी सर्वांचे स्वागत केले. सीमा देसाई यांनी सूत्रसंचानल केले.

अपेक्षांचे आव्हान हाताळण्यासाठी टीपीएम प्रणाली उपयुक्त

प्रारंभी पराग चिटणीस म्हणाले, आज स्पर्धा खूप आहेत. ग्राहकांच्या गरजा आणि अपेक्षा बदलत आहेत. ही आव्हाने हाताळण्यासाठी टीपीएम प्रणाली उपयुक्त ठरणार आहे. कोणत्याही यंत्रामध्ये बिघाड न होता ती 24 तास कार्यरत रहायला हवीत यासाठी ते हाताळणारे कर्मचारी कुशल असायला हवेत. या दृष्टीने हायलॉमध्ये दोन मशीन्स स्वबळावर तयार करण्यात आल्या असून, त्यामुळे 10 मिनिटांचा वेळ, 2 मिनिटावर तर 2 मिनिटांचा वेळ 30 सेकंदावर आला आहे.

Advertisement
Tags :

.