कियाची नवी इलेक्ट्रिक सिरॉस भारतात लाँच
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
भारतीय इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रामध्ये किया कंपनीने आपली नवी सिरॉस इलेक्ट्रिक कार नुकतीच लाँच केली आहे. बॅटरी अॅज अ सर्व्हिस या मॉडेल अंतर्गत सदरची नवी इलेक्ट्रिक कार ग्राहकांसाठी सादर करण्यात आली आहे.
या नव्या एसयूव्ही प्रकारातील इलेक्ट्रिक वाहनांची डिलिव्हरी 30 जुलैपासून सुरु होणार आहे. विविध व्हेरियंटमध्ये सदरची इलेक्ट्रिक कार सादर करण्यात आली आहे. यामध्ये एचटीके (42 केडब्ल्यूएच) ची किंमत 13.49 लाख रुपये, एचटीके/ ईआर (51.4 के. डब्ल्यू एच)ची किंमती 16.99 लाख, एचटीएक्सची किमत 17.99 लाख रुपये तर एक्सलाईन ईआरची किंमत 19.99 लाख इतकी असणार आहे.
एवढे मिळणार मायलेज
42 केडब्ल्यूएच बॅटरी असणाऱ्या इलेक्ट्रिक कारकडून 443 किलोमीटरचे मायलेज मिळणार आहे. तर 51.4 केडब्ल्यूएच बॅटरी असणाऱ्या कारकडून 526 किलो मीटरचे मायलेज मिळणार आहे.
फास्ट चार्जरची सोय
दूरवरचा म्हणजेच लांबवरचा प्रवास सोयीस्कर करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांमध्ये 100 केडब्ल्यू डीटी फास्ट चार्जर देण्यात आला. 10 ते 80 टक्के इतकी बॅटरी केवळ 39 मिनिटात चार्ज होणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे.