कियाची कॅरेन्स सीएनजी दाखल
वृत्तसंस्था/मुंबई
किया इंडिया कंपनीने आपली किया कॅरेन्स सीएनजी इंधनावर चालणारी कार भारतीय बाजारामध्ये नुकतीच दाखल केली आहे. सदरची गाडी ही एमपीवी गटामध्ये दाखल करण्यात आली असून या गाडीची किंमत याआधीच्या कॅरेन्सपेक्षा 77,900 रुपये अधिक आहे. मिळालेल्या माहितीनुसार कॅरेन्स सीएनजी या नव्या गाडीची किंमत अंदाजे 13.62 लाख रुपये इतकी असू शकते. यामध्ये आरटीओ, विमा सारख्या खर्चांचाही समावेश केलेला आहे. या नव्याने दाखल झालेल्या कारची वैशिष्ट्यो पाहता 15 आणि 16 इंचाचे टायर, हॅलोजन लॅम्प, हॅलोजन टेललॅम्प, शार्क फिन अँटीना, टिल्ड स्टीयरिंग, पावर विंडो, रियर ह्यू कॅमेरा, 12.5 इंचाचे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि आठ इंचाचे इन्फोटेनमेंट सिस्टीम, अँड्रॉइड ऑटो, अॅपल कार प्ले यासारख्या सुविधा यामध्ये देण्यात आलेल्या आहेत.
इतरही सुविधा
याशिवाय सेमी लेदरेट सीटस, टाइप सी चार्जिंग पोर्ट, की लेस एन्ट्री सारख्या सुविधा देखील मिळणार आहेत.
सुरक्षिततेसाठी 6 एअरबॅग्ज
सुरक्षिततेचा विचार करता या गाडीमध्ये सहा एअरबॅक्स देण्यात आल्या असून एबीएस सिस्टीम, इबीडी, इएससी, एचएसी, व्ही एसएम, डीबीसी, रियर पार्किंग सेन्सर, चारही चाकांना डिस्क ब्रेक, स्पीड सेन्सिंग डोर लॉक अशाही सुरक्षिततेच्या वैशिष्ट्यांचा यामध्ये समावेश केलेला आहे.