पहिल्यांदाच सैफसोबत झळकणार कियारा
कियारा अडवाणी सध्या ‘टॉक्सिक’ चित्रपटावरून चर्चेत आहे. या चित्रपटातील तिच्या इंटेंस रोलला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. आता कियाराला एक मोठा चित्रपट मिळाला असून यात तिची जोडी सैफ अली खानसोबत जमणार आहे. सैफ अन् कियारा प्रथमच एका इंटेंस थ्रिलर सुपरनॅचरल चित्रपटाकरता एकत्र येणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन कनिका ढिल्लों करत असून फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांची कंपनी याची निर्मिती करत आहे.
या चित्रपटाचे चित्रिकरण चालू वर्षाच्या अखेरपर्यंत सुरू होणार आहे. कनिकाचा हा चित्रपट पूर्णपणे एक इंटेंस सुपरनॅचल थ्रिलर धाटणीचा असेल, एक्सेल एंटरटेन्मेंटची टीम पटकथेवर दीर्घकाळापासून काम करत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
कनिका ढिल्लोंने यापूर्वी मनमर्जियां, केदारनाथ, जजमेंटल है क्या, हसीन दिलरुबा, रक्षाबंधन आणि डंकी यासारख्या चित्रपटांची लेखिका म्हणून काम केले आहे. याचबरोबर तिने क्रीति सेनॉनसोबत मिळून ‘दो पत्ती’ चित्रपटाची निर्मिती केली होती. आता ती सैफ आणि कियारा यांची मुख्य भूमिका असलेल्या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पदार्पण करणार आहे.