For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘की अँड का’च्या सीक्वेलमध्ये कियारा

06:48 AM Oct 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘की अँड का’च्या सीक्वेलमध्ये कियारा
Advertisement

एका नव्या चित्रपटावरून कियारा अडवाणीचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे. 10 वर्षे जुन्या चित्रपटाच्या सीक्वेलसाठी कियाराची निवड करण्यात आली आहे. 2016 साली प्रदर्शित चित्रपट ‘की अँड का’चा सीक्वेल निर्माण केला जाणार आहे. की अॅँड का 2 चित्रपटात मूळ कहाणी पुढे नेली जाणार नाही, तर की आणि का नावाच्या पात्रांनाच केंद्रस्थानी ठेवत एक नवी कहाणी मांडली जाणार आहे.

Advertisement

या चित्रपटात नायिका म्हणून कियाराची निवड करण्यात आली आहे. कियाराचा नायक म्हणून अद्याप अभिनेत्याचे नाव निश्चित करण्यात आलेले नाही. मूळ चित्रपट ‘की अँड का’मध्ये करिना कपूर आणि अर्जुन कपूर मुख्य भूमिकेत होते. तर नव्या चित्रपटाचे निर्मितीपूर्व काम सध्या सुरू आहे. चालू वर्षाच्या अखेरपर्यंत नव्या चित्रपटाचे चित्रिकरण सुरू होणार आहे. मूळ चित्रपटाचे दिग्दर्शन आर. बाल्की यांनी केले होते, ज्यात स्त्राr-पुरुषांच्या पारंपरिक व्यक्तिरेखांना बदलण्याचा एक अनोखा अन् मजेशीर संदेश देण्यात आला होता.

Advertisement
Advertisement
Tags :

.