‘शक्ति शालिनी’मध्ये कियारा
मॅडॉक फिल्म्सकडून निर्मिती
मागील वर्षी स्त्राr 2 यासारखा ब्लॉकबस्टर चित्रपट तयार करणारे मॅडॉक फिल्म्स स्वत:च्या आगामी प्रोजेक्टवरून चर्चेत आहे. या नव्या चित्रपटाचे नाव ‘शक्ति शालिनी’ असणार आहे. या चित्रपटात कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत असणार आहे.
मॅडॉक फिल्म्स स्वत:च्या सुपरनॅचरल युनिव्हर्ससाठी ओळखले जाते. चित्रपट शक्ति शालिनी 31 डिसेंबर रोजी प्रदर्शित करण्याचा विचार आहे. चित्रपटात मुख्य भूमिकेसाठी निर्मात्यांनी कियारा अडवाणीची निवड केली आहे. निर्मात्यांना पडद्यावर सशक्त भूमिका साकारणारी अभिनेत्री हवी होती, याचमुळे कियाराची निवड करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
शक्ति शालिनी हा कियाराचा मॅडॉक फिल्म्ससोबतचा पहिला प्रोजेक्ट ठरणार आहे. कियारा यापूर्वी गेमचेंजर या चित्रपटात दिसून आली आहे. हा चित्रपट 10 जानेवारी रोजी प्रदर्शित झाला होता. याचबरोबर कियारा ही वॉर 2 या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटात ऋतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर हे देखील दिसून येणार आहेत. याचे दिग्दर्शन अयान मुखर्जी यांनी केले आहे.