मीना कुमारींच्या बायोपिकमध्ये कियारा
प्रसिद्ध डिझाइनर मनीष मल्होत्रा मीना कुमारी यांच्या जीवनावर आधारित एक चित्रपट निर्माण करणार आहेत. या चित्रपटात क्रीति सेनॉन ही मीना कुमारी यांची व्यक्तिरेखा साकारणार होती. परंतु तिचा पत्ता आता कट झाला असल्याचे समोर आले आहे. तिच्याऐवजी अन्य अभिनेत्रीची निवड करण्यात आल्याचे समजते.
कियारा अडवाणी ही आता या चित्रपटात मीना कुमारींच्या व्यक्तिरेखेत दिसून येणार आहे. निर्माते बिलाल अमरोही चित्रपटात मीना कुमारी आणि त्यांचे पती कमल अमरोही यांची कहाणी दाखविणार आहेत. मीना कुमारी यांच्या व्यक्तिरेखेकरता कियारा अत्यंत योग्य अभिनेत्री असल्याचे निर्मात्यांचे मानणे आहे. कियारा या चित्रपटाकरता उर्दू भाषा शिकण्याचा प्रयत्न करणार असल्याचे बोलले जात आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण पुढील वर्षी सुरू होणार आहे. अभिनेत्रीने अलिकडेच अपत्याला जन्म दिला आहे, चित्रिकरणाला अद्याप विलंब असल्याने कियाराला याच्या तयारीकरता मोठा वेळ मिळणार आहे. तर कमल अमरोही यांच्या व्यक्तिरेखेसाठी अद्याप अभिनेत्याची निवड करण्यात आलेली नाही. तर चित्रपटाचे नाव ‘कमल और मीना’ असेल.