"डॉन-३" मधून कियारा अडवाणी आऊट ?
मुंबई
अभिनेता रणवीर सिंगची प्रमुख भूमिका असलेला "डॉन-३" आता पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे. फरहान अख्तरच्या डॉनच्या तिसऱ्या भागामधून कियारा अडवणीने बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
अभिनेत्री कियारा अडवाणी ने "डॉन-३" सोडण्यामागे एक गुड न्यूज आहे. कियारा अडवाणीने गरोदरपणाच्या घोषणेनंतर "तिच्या वैयक्तिक आयुष्याला प्राधान्य देण्यासाठी" चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कियारा अडवाणीने "सध्या फरहान अख्तरच्या "डॉन-३" चित्रपटापेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्याला प्राधान्य देण्याचे निवडले आहे." परंतु, अलीकडील घडामोडींबद्दल कियारा अडवाणी किंवा "डॉन ३" च्या निर्मात्यांकडून अद्याप अधिकृतरित्या पुष्टी मिळालेली नाही.
गेल्या वर्षी, निर्मात्यांनी घोषणा केली होती की कियारा आडवाणी चित्रपटाचा भाग असेल. एक्सेल एंटरटेनमेंटने सोशल मीडियावर लिहिले होते, "डॉन विश्वात आपले स्वागत आहे कियारा अडवाणी 'डॉन३'." तथापि, घोषणा व्हिडिओमध्ये चित्रपटातील कियाराच्या भूमिकेबद्दल कोणतीही माहिती उघड करण्यात आली नव्हती.