महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘गेम चेंजर’मध्ये कियारा अडवाणी

06:57 AM Aug 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

राम चरणची नायिका साकारणार

Advertisement

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेती कियारा अडवाणीने अलिकडेच स्वत:चा 33 वा जन्मदिन साजरा केला आहे. बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री म्हणून तिने ओळख निर्माण केली आहे. कियाराने 2014 मध्ये ‘फगली’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

Advertisement

10 वर्षांच्या या कारकीर्दीत कियाराने अनेक मोठमोठ्या अभिनेत्यांसोबत काम केले आहे. आता कियारा लवकरच जागतिक स्टार राम चरणसोबत दिसून येणार आहे. कियारा आणि राम चरण यांची जोडी ‘गेम चेंजर’ या चित्रपटात दिसून येणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील गाणी प्रदर्शित करण्यात आली होती. आता निर्मात्यांनी अभिनेत्रीचा चित्रपटातील लुक सादर केला आहे.

श्री वेंकटेश्वर क्रिएशन्सकडून कियाराचे पोस्टर शेअर करण्यात आले आहे, यात ती जगरांडी गाण्यातील लुकमध्ये दिसून येत आहे. गेम चेंजर हा एक पॉलिटिकल ड्रामा पट असून याचे बजेट अत्यंत मोठे आहे. सुमारे 300-400 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये हा चित्रपट तयार करण्यात येत आहे. गेम चेंजर या चित्रपटात राम चरण दोन व्यक्तिरेखा साकारताना दिसून येणार आहे.

तर कियारा यापूर्वी कार्तिक आर्यनसोबत ‘सत्य प्रेम की कथा’ या चित्रपटात दिसून आली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर समाधानकारक कामगिरी करू शकला होता. कियारा आता गेम चेंजर या चित्रपटात जबीलम्मा या व्यक्तिरेखेत दिसून येणार आहे. याचबरोबर ती ‘वॉर 2’ या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार असल्याचे समजते.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article