किया सोनेटने केला 4 लाखचा टप्पा पार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपनी किया सोनेटने चार लाख विक्रीचा टप्पा ओलांडत विक्रीचा विक्रम नोंदवला आहे. गेल्या 44 महिन्यांमध्ये कंपनीने देशांतर्गत आणि देशाबाहेर सदरची विक्रमी विक्रीची नोंद केली आहे.
देशांतर्गत पातळीवर एकूण 3 लाख 17 हजार 754 वाहनांची विक्री कंपनीने केली असून 85 हजार 814 वाहनांची निर्यात इतर देशांमध्ये करण्यात आली आहे. एसयुव्ही गटातील किया सोनेटची किंमत 7.99 लाख ते 15.7 लाख रुपये इतकी आहे. किया सोनेटने आपल्या ताफ्यामध्ये एचटीई (ओ) आणि एचटीके (ओ)s या डिझेल आणि पेट्रोल इंजिनसहच्या दोन नव्या गाड्यांचा समावेश केला आहे. एलइडी टेल लॅम्प, फुल्ली ऑटोमॅटिक टेंपरेचर कंट्रोल आणि रियर डिफॉगर यासारख्या सुविधा या दोन मॉडेलमध्ये समाविष्ट केल्या आहेत.
सोनेट या वाहनाच्या विक्रीमधील विक्रमाबाबत बोलताना किया इंडियाचे मुख्य विक्री अधिकारी मुयांग सिक सोन त्यांनी सांगितले, की एसयुव्ही गटामध्ये सदरच्या कारने प्रचंड लोकप्रियता प्राप्त केली आहे. पहिल्यांदा कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांचा वाटा अधिक राहिला असल्याचेही त्यांनी सांगितले. कल्पकतेच्या माध्यमातून तयार केलेली सोनेट ही दुसरी अप्रतिम कार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. तंत्रज्ञानाची साथ, चांगले डिझाईन या सकारात्मक गोष्टी सोनेटच्या पसंतीकरिता ग्राह्य आहेत असेही त्यांनी सांगितले.