किया सिरोस प्रीमियम एसयूव्ही लाँच
सुरुवातीची किंमत 8.99 लाख : पेट्रोलमध्ये 18.20, डिझेलमध्ये 20.75 केएमपीएलचे मायलेज
नवी दिल्ली :
किया मोटर्स इंडियाने भारतीय बाजारात प्रीमियम मिडसाइज एसयूव्ही सिरोस सादर केली आहे. कोरियन कंपनीने कारला वेगवेगळ्या सेगमेंटवर फर्स्ट प्रीमियम फिचर्ससोबत सादर केले होते. कंपनीने दावा केला आहे, की पेट्रोल इंजिन सोबत 18.20 केएमपीएल आणि डिझेल इंजिन सोबत 20.75 केएमपीएल इतके मायलेज देणार आहे.
भारतामध्ये 4 मीटर सेगमेंटमधील पहिली कार आहे, ज्यामध्ये सर्व सीट वेंटिंलेटेड आणि इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल आहे. यासह एसयूव्हीमध्ये 60.40 स्प्लिट रिक्वाइन रियर सीट आज्णि पॅनारोमिक सनरुफ सारखी फिचर्स मिळणार आहेत.
किया प्रीमियम मिडसाइज एसयूव्ही सिरोसची भारतीय बाजारामधील किंमत ही 8.99 लाख ते 17.80 लाख राहणार आहे. भारतीय बाजारातील ही पाचवी एसयूव्ही आहे. या गाडीची टक्कर थेट कोणासोबत नसणार आहे, तर ह्युंडाई क्रेटा, मारुती ग्रँड विटारा आणि किया सेल्टोस यासारख्या कॉम्पेक्ट एसयूव्हीसोबत स्पर्धा राहणार आहे. तर टाटा नेक्सॉन, मारुती ब्रेझा, महिंद्रा एक्सयूव्ही 3एक्सओ आणि ह्युंडाई वेन्यू सारख्या गाड्यांना टक्कर राहणार आहे.