किआ सेल्टॉस 2025 लाँच
06:29 AM Feb 22, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
24 ट्रिम्समध्ये तीन मॉडेल सादर : सुरुवातीची किंमत 11.12 लाख
Advertisement
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
किया इंडियाने भारतीय बाजारपेठेसाठी त्यांच्या कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेल्टॉस 2025चे नवीन व्हेरिएंट लाँच केले आहे. कंपनीने त्यांच्या मिड-साइड एसयूव्हीची संपूर्ण लाईन-अप अपडेट केली आहे. इतकेच नाही तर कंपनीने या एसयूव्हीच्या लाईन-अपमध्ये काही नवीन मॉडेल्स देखील जोडली आहेत.
Advertisement
सेल्टॉस 2025 आता तीन व्हेरिएंटसह एकूण 24 ट्रिम्समध्ये उपलब्ध असेल. किआ सेल्टॉसच्या एचटीई (ओ), एचटीके आणि एचटीके (ओ) व्हेरिएंटमध्येही नवीन वैशिष्ट्यो आली आहेत. कंपनीने सेल्टॉस 2025 बेस मॉडेल एचटीई (ओ) ची किंमत 11.12 लाख (एक्स-शोरूम) ठेवली आहे. त्याच वेळी, सेल्टॉस 2025 एक्स-लाइनचे टॉप मॉडेल 20,50,900 (एक्स-शोरूम) किमतीत उपलब्ध असेल.
Advertisement