किया इंडियाची सुधारीत सेल्टॉस येणार
नवी एसयुव्ही 10 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय बाजारात लाँच होणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दक्षिण कोरियाची कार निर्माती कंपनी किया इंडिया यांची नवी सुधारित सेल्टॉसची एसयुव्ही आवृत्ती लवकरच बाजारात दाखल केली जाणार आहे. या गाडीमध्ये अनेक महत्त्वाचे बदल करण्यात येणार असल्याची माहिती मिळते आहे. सेकंड जनरेशन मॉडेल कंपनी लॉन्च करणार असून सदरची नवी गाडी ही पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये पुढील महिन्यामध्ये 10 तारखेला लॉन्च केली जाणार आहे. त्यानंतर कदाचित पुढच्या वर्षी भारतीय बाजारात ही गाडी सादर केली जाईल.
ही आहेत वैशिष्ट्यो
नव्या एसयुव्ही सेल्टॉसमध्ये अनेक विविध वैशिष्ट्यांचा समावेश करण्यात आला आहे. यात अंतर्गत आणि बाह्य दोन्ही बाबतीमध्ये बदल करण्यात आलेला आहे. वर्टीकल एलईडी डीआरएल, नवे फ्रंट ग्रील, नवे बंपर आणि फॉगलॅम्प गाडीमध्ये देण्यात आले आहे. यामध्ये 6 एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, 360 डिग्रीचा कॅमेरा ही वैशिष्ट्यो देण्यात आली आहेत.
इंजिन व इतर सुविधा
गाडीच्या इंजिनचा विचार करता 1.5लिटर एनए पेट्रोल, 1.5 लिटर टर्बो पेट्रोल आणि 1.5 लिटर डिझेल इंजिनचा समावेश करण्यात आला आहे. गिअर बॉक्स पर्यायामध्ये 6 स्पीड मॅन्युअल, 6 स्पीड टॉर्क कन्वर्टर ऑटोमॅटिक, 6 स्पीड आयएमटी, सीवीटी आणि 7 स्पीड ड्युल क्लच ऑटोमॅटिक हे पर्याय दिलेले आहेत. सदरच्या नव्या गाडीची किंमत ही 11 लाख 30 हजार रुपयांपासून सुरू होऊन 22 लाखापर्यंत असणार आहे.