किया इंडियाही वाढवणार वाहनांच्या किमती
06:43 AM Jun 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
1 जुलैपासून येणार नवे दर अंमलात : टाटाच्या गाड्या महागणार
Advertisement
वृत्तसंस्था नवी दिल्ली
वाहनांच्या किमती वाढवण्याचा सपाटा सुरूच असून आता किया इंडिया यांनीही 1 जुलैपासून आपल्या सर्व प्रकारातील कार्सच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. खर्चामध्ये झालेल्या वाढीमुळे कंपनीला हा निर्णय घ्यावा लागतो आहे. परिणामी कंपनी त्यांच्या सर्व प्रकारातील कारच्या किमती वाढवणार आहे. सर्व मॉडेलच्या किमती जवळपास दोन टक्क्यांपर्यंत महाग होणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. ही वाढ 1 जुलै 2026 पासून अमलात येणार असल्याचेही सांगितले जात आहे. किया सोनेट, सीरॉस, सेल्टॉस, कॅरेन्स, कॅरेन्स क्वालीस, कार्निवल, कॅरेन्स क्वालीस इव्ही, इव्ही 6 आणि ईव्ही 9 या गाड्यांच्या किमती वाढणार आहेत.
Advertisement
Advertisement