किया कार्निव्हल भारतीय बाजारात दाखल
चौथ्या पिढीची गाडी : ड्युअल ईव्ही सनरुफ
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
किया इंडियाने 3 ऑक्टोबर रोजी भारतातील सर्वात आलिशान एमपीव्ही कार्निव्हल लिमोझिन हे चौथ्या पिढीचे मॉडेल लाँच केले आहे. कोरियन कंपनीची ही प्रीमियम फीचर्सची कार आहे. सदरची लक्झरी एमपीव्ही पॉवर स्लाइडिंग रिअर डोअर आणि ड्युअल इलेक्ट्रिक सनरूफ यांसारख्या वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे.
नवीन कार्निव्हल सिंगल फुल्ली लोडेड व्हेरियंट लिमोझिन प्लस व्हेरियंटमध्ये ऑफर करण्यात आली आहे. 2024 किआ कार्निवलची सुरुवातीची किंमत 63.90 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. किया एमपीव्हीचे बुकिंग आधीच सुरु झाले आहे. खरेदीदार सदरची कार अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाइन बुक करू शकतात किंवा किया डीलरशिपमध्ये 2 लाख रुपये टोकन रक्कम देऊन ऑफलाइन बुक करू शकतात. कारचे सेकंड जनरेशन मॉडेल भारतात विक्रीसाठी उपलब्ध आहे. याची किंमत टोयोटा इनोव्हा हायक्रॉस (19.77 लाख - 30.98 लाख) वर प्रीमियम पर्याय म्हणून आणि टोयोटा वेलफायर (1.22 कोटी - 1.32 कोटी) आणि लेक्सेस एलएम पेक्षा अधिक देखील असू शकते.