खुशीला ज्युडो स्पर्धेत रौप्यपदक
10:45 AM Oct 28, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खात्यामार्फत आयोजित राज्यस्तरीय ज्युडो स्पर्धेत मॉडर्न एज्युकेशन सोसायटी संचलित श्री छत्रपती शिवाजी विद्यामंदिर हायस्कूल हालशीची विद्यार्थिनी खुशी सुतारने 70 किलो वजन गटात ज्युडोमध्ये रौप्य पदक पटकविले. राज्यस्तरीय स्पर्धेत दावणगिरी, बेंगळूर, गदग, बागलकोट, चिकोडी, सौंदत्ती कलबुर्गी, विजापूर, हसन जिल्ह्यातील स्पर्धक सहभागी झाले होते. खुशीला मुख्याध्यापक किरण देसाई, क्रीडा शिक्षिका शामल बेळगावकर यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभत आहे.
Advertisement
Advertisement