For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अर्जुनसोबत झळकणार खुशी

06:48 AM Aug 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
अर्जुनसोबत झळकणार खुशी
Advertisement

पहिल्यांदाच एकत्र दिसणार भाऊ-बहिण

Advertisement

अर्जुन कपूर आणि खुशी कपूरने एक पोस्ट करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. दोघांनी एक व्हिडिओ शेअर केला असून त्यावर ‘मेरे खुशी अर्जुन आएंगे’ असे नमूद आहे. एका प्रोजेक्टकरता खुशी आणि अर्जुन कपूर पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहेत. खुशी आणि अर्जुन हे सावत्र भावंडं असून बोनी कपूर त्यांचे वडिल आहेत.

या प्रोजेक्टचा अधिक तपशील अद्याप समोर आलेला नाही. परंतु व्हिडिओमुळे चाहत्यांमधील उत्सुकता वाढली आहे. खुशी आणि अर्जुन पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. अर्जुन कपूर अद्याप बॉलिवूडमध्ये स्वत:चे स्थान निर्माण करू शकलेला नाही. तर खुशी कपूर हिचा पदार्पणातील चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला असून त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता.

Advertisement

अर्जुन कपूर लवकरच रोहित शेट्टीचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘सिंघम अगेन’मध्ये दिसून येणार आहे. यात अजय देवगण, दीपिका पदूकोन, करिना कपूर, टायगर श्रॉफ, जॅकी श्रॉफ, रणवीर सिंह आणि अक्षय कुमार यासारखे कलाकार असणारआहेत. दुसरीकडे खुशीने जोया अख्तरचा चित्रपट ‘द आर्चीस’द्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यातील खुशीच्या अभिनयाचे फारसे कौतुक झाले नव्हते.

Advertisement
Tags :

.