For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खुशी कपूर पुन्हा स्वत:च्या एक्सच्या प्रेमात

06:47 AM Sep 12, 2026 IST | Tarun Bharat Portal
खुशी कपूर पुन्हा स्वत च्या एक्सच्या प्रेमात
Advertisement

श्रीदेवी यांची कन्या खुशी कपूर स्वत:च्या चित्रपटांपेक्षा खासगी आयुष्यावरून अधिक चर्चेत असते. अभिनेत्री यापूर्वी आर्चीज मधील स्वत:चा सहकलाकार वेदांग रैनाला डेट करत होती. दोघेही सुमारे दोन वर्षांपर्यंत एकत्र राहिले, परंतु नंतर त्यांचा ब्रेकअप झाला. परंतु आता खुशी स्वत:चा बालपणीचा मित्र आकाश मेहताला डेट करत आहे. आकाश हा तिचा एक्स बॉयफ्रेंड देखील राहिला आहे.

Advertisement

वेदांगसोबतचा ब्रेकअप खुशीवर मोठा प्रभाव पाडणारा होता. हा खुशीसाठी मोठा झटका होता. परंतु आता ती चांगल्या स्थितीत परतली आहे. खुशी आकाशसोबत आनंदात असून आता कुठल्याही कलाकाराला डेट करू इच्छित नाही.

खुशीचे जवळचे मित्र आणि परिवाराचे सदस्यही आकाशला इन्स्टाग्रामवर फॉलो करतात आणि यात जान्हवी कपूर, अनन्या पांडे, ओरी, अर्जुन कपूर, अंशुला कपूर, शिखर पहारिया, नव्या नवेली नंदा आणि शनाया कपूर देखील सामील आहे.

Advertisement

खुशी सध्या स्वत:च्या आगामी प्रोजेक्टच्या तयारीत व्यग्र आहे. ती स्वत:ची आई  श्रीदेवीचा चित्रपट ‘मॉम’च्या स्प्रीच्युअल सीक्वेलमध्ये दिसून येणार आहे. खुशीने 2023 मध्ये ‘द आर्चीज’पासून अभिनयाची कारकीर्द सुरू केली होती आणि मागील वर्षी ‘नादानियां’ आणि ‘लवयापा’मध्ये दिसून आली होती.

Advertisement
Tags :

.