For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खुशी कपूरअन् वेदांगचा ब्रेकअप

07:00 AM Jan 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
खुशी कपूरअन् वेदांगचा ब्रेकअप
Advertisement

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची कन्या आणि जान्हवी कपूरची बहिण खुशी कपूर आणि वेदांग रैनाचा ब्रेकअप झाला आहे. दोन वर्षांपेक्षा अधिक काळापर्यंत परस्परांना डेट केल्यावर आता ते वेगळे झाले आहेत. दोघांचेही नाते संपुष्टात आले असले तरी त्यामागील कारण समोर आलेले नाही. वेदांग आणि खुशी यांच्या रिलेशनशिपची चर्चा 2023 पासून सुरू झाली होती. दोघांनी जोया अख्तरचा चित्रपट ‘द आर्चीज’मध्ये काम केले होते. याच्या सेटवर दोघांची मैत्री झाली आणि मग ते अनेकदा एकत्र दिसू लागले होते. परंतु दोघांनी स्वत:च्या रिलेशनशिपची कधीच पुष्टी दिली नव्हती. परंतु खुशीने वेदांगसोबतच्या स्वत:च्या नात्याची अप्रत्यक्ष कबुली दिली होती. खुशीने 2023 मध्ये ‘द आर्चीज’नंतर ‘लवयापा’ आणि ‘नादानियां’मध्ये काम केले होते. हे दोन्ही चित्रपट मागील वर्षी प्रदर्शित झाले होते. परंतु या दोन्ही चित्रपटांना फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. खुशी आता लवकरच ‘मॉम 2’ चित्रपटात दिसून येणार आहे. तर वेदांग हा यापूर्वी आलिया भट्टसोबत ‘जिगरा’ चित्रपटात दिसून आला होता.

Advertisement

Advertisement
Tags :

.