वेबसीरिजमध्ये झळकणार खुशाली कुमार
‘घुडचडी’ चित्रपटात रविना टंडन आणि संजय दत्तसोबत अभिनय केलेली खुशाली कुमार आता ओटीटीवर पदार्पण करणार आहे. एका वेबसीरिजच्या दुसऱ्या सीझनमध्ये ती काम करत आहे. फॅशन आणि म्युझिक व्हिडिओद्वारे कारकीर्द सुरू करणारी खुशाली आता चित्रपट अन् वेबसीरिजवर अधिक लक्ष केंद्रीत करत आहे. खुशाली ही ‘सपने व्हर्सेस एवरीवन’च्या सीझन 2 मध्ये दिसून येणार आहे. या सीरिजमध्ये खुशाली ‘तृप्ती’ नावाच्या युवतीची भूमिका साकारणार आहे. पहिल्यांदाच ओटीटीवर काम करणे माझ्यासाठी अत्यंत खास आणि भावुक अनुभव असल्याचे तिने म्हटले आहे. खुशाली ही यापूर्वी ‘घुडचढी’ चित्रपटात दिसून आली होती. याचबरोबर ‘धोका : राउंड डी कॉर्नर’, ‘स्टारफिश’, ‘डेढ बीघा जमीन’ यासारख्या चित्रपटांमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. तसेच टी-सीरिजचे अनेक लोकप्रिय संगीत व्हिडिओ म्हणजेच ‘मैनु इश्क दा’, ‘हायवे स्टार’ आणि रात कमाल है’मध्ये तिने काम केले होते.