For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘दुल्हनिया ले आएगी’मध्ये खुशाली

06:52 AM Jul 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘दुल्हनिया ले आएगी’मध्ये खुशाली
Advertisement

अभिनेत्री खुशाली कुमारचा आगामी चित्रपट ‘दुल्हनिया ले आएगी’चा फर्स्ट लुक पोस्टर जारी करण्यात आला आहे. या पोस्टरमध्ये खुशाली ही नटलेल्या वधूच्या पोशाखात दिसून येत आहे. याचबरोबर निर्मात्यांनी प्रदर्शनाची तारीखही जारी केली आहे. या फर्स्ट लुकमध्ये खुशाली लाल रंगाच्या ड्रेसमध्ये दिसून येत असून वधूप्रमाणे नटलेल्या खुशालीच्या  डोळ्यांवर काळा चष्मा आहे. या पोस्टरमध्ये खुशाली बेडवर पहुडलेली आहे. दुल्हनिया ले आएगी हा चित्रपट 24 जुलै रोजी प्रदर्शित केला जाणार आहे.

Advertisement

या चित्रपटात खुशालीसोबत पियूष मिश्रा आणि महेश मांजरेकर हे कलाकार प्रमुख भूमिकांमध्ये दिसून येतील. या चित्रपटाचे दिग्दर्शन आकाशदित्य लामा यांनी पेले आहे. तर चित्रपटाची निर्मिती सिद्धार्थ बॅनर्जी, आकाशदित्य लामा आणि विकास अग्रवाल यांनी केली आहे. हा चित्रपट एक कौटुंबिक ड्रामा असेल, ज्यात नातेसंबंध, सणसमारंभ, विवाहाचा आनंद आणि अचानक निर्माण होणाऱ्या मजेशीर स्थितींना दाखविण्यात येणार आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.