महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

सौराष्ट्रचा 183 धावांत खुर्दा

06:39 AM Feb 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ कोईमतूर

Advertisement

2024 च्या रणजी क्रिकेट स्पर्धेतील शुक्रवारपासून येथे सुरू झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात तामिळनाडूने विद्यमान विजेत्या सौराष्ट्रला पहिल्या डावात 183 धावात उखडले. तामिळनाडू संघातील गोलंदाज साईकिशोरने 66 धावात 5 गडी बाद केले. दिवसअखेर तामिळनाडूने 1 बाद 23 धावा जमवल्या.

Advertisement

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना सौराष्ट्रचा पहिला डाव 77.1 षटकात 183 धावात आटोपला. सलामीचा केव्हिन जिवराजेनी खाते उघडण्यापूर्वीच बाद झाला. दुसरा सलामीचा फलंदाज हार्विक देसाईने दमदार फलंदाजी करत 83 धावांचे योगदान दिले. जॅक्सनने 22 धावा जमवल्या. देसाई आणि जॅक्सन यांनी 47 धावांची भागीदारी केली. चेतेश्वर पुजारा केवळ 2 धावावर बाद झाला. सौराष्ट्रची एकवेळ स्थिती 3 बाद 61 अशी केविलवाणी होती. हार्विक देसाई आणि वासवदा यांनी चौथ्या गड्यासाठी 44 धावांची भागीदारी केली. वासवदाने 25 धावा जमवल्या. प्रेरक मंकडने नाबाद 35 धावा केल्या. तामिळनाडूतर्फे साईकिशोर सर्वात प्रभावी गोलंदाज ठरला. त्याने 66 धावात 5 गडी बाद केले. अजित रामने 3 तर संदीप वॉरियरने 2 बळी मिळवले. त्यानंतर दिवसअखेर तामिळनाडूच्या डावात सलामीचा विमलकुमार 5 धावावर बाद झाला. जगदीशन 12 धावावर खेळत आहे.

संक्षिप्त धावफलक : सौराष्ट्र प. डाव 77.1 षटकात सर्वबाद 183 (हार्विक देसाई 83, वासवदा 25, प्रेरक मंकड नाबाद 35, साईकिशोर 5-66), तामिळनाडू प डाव 10 षटकात 1 बाद 23.

Advertisement
Tags :
##tarunbharat#akaluj #tarunbharatnews#sports
Next Article