Khokad In Kolhapur: दुर्मिळ खोकड दिसते तरी कसे?, मसाई पठावर 4 खोकडांचा वावर
सध्या पठारावर चार खोकड प्राणी वावरत आहेत.
By : अबिद मोकाशी
पन्हाळा : मसाई पठारावर दुर्मिळ असलेला खोकड या वन्यप्राण्यांचे दर्शन झाले आहे. त्यामुळे पन्हाळ्यासह परिसरातील जंगल वन्यप्राण्यांचे हक्काचे निवारा बनत चालल्याचे समोर येत आहे. रविवारी मसाई पठारावर फिरण्यासाठी गेलेल्या आपटी गावातील शशिकांत बच्चे यांना व त्यांच्या कुटुंबीयांना या प्राण्याचे दर्शन झाले. हे कोल्याचे बछडे असल्याचा समज झाला.
पण पन्हाळा वनविभागाला याबाबत विचारले असता हा कोल्हा नसुन खोकड असल्याचे स्पष्ट झाले. सध्या पठारावर चार खोकड प्राणी वावरत आहेत. खोकड अर्थात बेंगाल फॉक्स असे त्याचे शास्त्रीय नाव आहे. याचे डोके आणि धड मिळून लांबी ४५६० सेंमी; शेपूट २५३५ सेंमी; वजन २३ किग्रॅ. असते.
आकाराने लहान व सडपातळ; पाय बारीक; शेपटीचे टोक काळे; शरीराचा रंग करडा किंवा राखी; डोके, मान आणि कानाची मागची बाजू पुसट काळसर; बंडीत याचा रंग पांढुरका होतो पण पाय तांबूसच असतात. हिवाळ्यात उत्तर भारतातील खोकडांना दाट आणि सुंदर केस येतात व त्यांनी थंडीचे निवारण होते.
खोकड मोकळ्या मैदानात राहतो
झुडपे असलेल्या भागात तो नेहमी राहतो. काही खोकड लागवडीखालच्या जमिनीत, कालव्यांच्या आसपास किंदा खडकाळ जमिनीत बिळे करून राहतात. खोकड निशाचर आहे; दिवसा तो झोप घेतो व तिन्हीसांजेनंतर भक्ष्य शोधण्याकरिता बाहेर पडतो.
अंधार दाटून आल्यावर याचे ओरडणे सुरू होते. लहान सस्तन प्राणी, सरपटणारे प्राणी, खेकडे आणि कीटक हा खातो. कलिंगडे, बोरे आणि हरबऱ्याचे घाटे देखील तो खातो. हा शेतकऱ्यांना हितकारक असल्याचे वनपाल संदीप पाटील यांनी सांगितले.