For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दिल्लीतील राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे खो-खो संघ जाहीर

06:45 AM Mar 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
दिल्लीतील राष्ट्रीय स्पर्धेसाठी  महाराष्ट्राचे खो खो संघ जाहीर
Advertisement

56 वी राष्ट्रीय पुरुष-महिला अजिंक्यपद खो-खो स्पर्धा

Advertisement

प्रतिनिधी/ मुंबई

भारतीय खो खो महासंघाच्या वतीने दिल्ली येथे 28 मार्च ते 01 एप्रिल या कालावधीत 56 व्या पुरुष महिला राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र खोखो असोसिएशनचे सरचिटणीस अॅड. गोविंद शर्मा यांनी महाराष्ट्राचे संघ जाहीर केले आहेत. निवड झालेल्या खेळाडूंनी 19 मार्च रोजी सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत के. के. एम. कॉलेज, मानवत जि. परभणी येथे राष्ट्रीय स्पर्धापूर्व सराव शिबिरात सहभागी व्हावे अशी सूचना सरचिटणीस अॅड. गोविंद शर्मा यांनी दिली. तसेच सराव शिबिराच्या शेवटी कर्णधारांची निवड घोषित केली जाईल असेही त्यांनी जाहीर केले. निवड झालेल्या खेळाडूंनी मॅट शूज, आधार कार्ड व 2 फोटो सोबत आणावेत, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Advertisement

महाराष्ट्राचा संघ पुढीलप्रमाणे -

पुरुष गट : प्रतिक वाईकर, सुयश गरगटे, राहुल मंडल, वृषभ वाघ, आदित्य गणपुले (सर्व पुणे), अनिकेत चेंदवणकर, ऋषिकेश मुर्चावडे, निखिल सोडीये, अक्षय भांगरे (सर्व मुं. उपनगर), दिलीप खांडवी (नाशिक), लक्ष्मण गवस (ठाणे), अक्षय मासाळ, सौरभ घाडगे (सर्व सांगली), विजय शिंदे (धाराशिव), शुभम जाधव (परभणी), राखीव : वेदांत देसाई (मुंबई), गजानन शेंगाळ (ठाणे), सुरज लांडे (सांगली). प्रशिक्षक : शिरीन गोडबोले (पुणे), सहाय्यक प्रशिक्षक : पवन पाटील (परभणी) व्यवस्थापक :अनिल नलवाडे (परभणी).

महिला गट : प्रियांका इंगळे, काजल भोर, स्नेहल जाधव, कोमल दारवटकर, हृतिका राठोड (सर्व पुणे), रेश्मा राठोड, पूजा फरगडे, किशोरी मोकाशी (सर्व ठाणे) गौरी शिंदे, संपदा मोरे, ऋतुजा खरे, अश्विनी शिंदे (सर्व धाराशिव), पायल पवार (रत्नागिरी), सानिका चाफे (सांगली) मिताली बारसकर (मुं. उपनगर).

राखीव : अपेक्षा सुतार (रत्नागिरी), प्रतीक्षा बिराजदार (सांगली), निशा वैजाल (नाशिक) प्रशिक्षक : प्रवीण बागल (धाराशिव), सहाय्यक प्रशिक्षक : प्राची वाईकर (पुणे), व्यवस्थापिका : वैशाली सावंत (परभणी).

Advertisement
Tags :

.