For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Ratnagiri News : उभ्या आरामबसवर कार धडकल्याने पाचजण गंभीर

05:45 PM May 10, 2026 IST | NEETA POTDAR
ratnagiri news    उभ्या आरामबसवर कार धडकल्याने पाचजण गंभीर
Advertisement

                                                गेल्या आठवडाभरात ८ अपघात घडले

Advertisement

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील भरणेनजीक अपघातांची मालिका सुरुच आहे. शनिवारी सकाळी ७.१५ वाजण्याच्या सुमारास एस. एम. एस. हॉस्पिटलसमोर उभ्या खासगी आरामबसवर स्विफ्ट कार धडकली. अपघातात ५ जण गंभीर जखमी झाले. कारमध्ये अडकलेल्या प्रवाशांना अथक प्रयत्नाने बाहेर काढून उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हा अपघात इतका भीषण होता की, कारच्या दर्शनी भागाचा चुराडा झाला. परशुराम गुणाजी थेराडे (५०), प्रतीक्षा परशुराम थेराडे (४५), शिल्पा परशुराम थेराडे (२५), अर्जुन घोंडिबा चाळके (२७, सर्व रा. संगमेश्वर), जनार्दन (२८) अशी जखमींची नावे आहेत. खासगी आरामबस (एम.एच.१०/झेड.जी. ५०५४) प्रवाशांना घेवून मुंबई येथून गोव्याच्या दिशेने जात होती.

Advertisement

प्रवाशांना उतरण्यासाठी बस भरणेनजीक रस्त्यालगत थांबली होती.  याचवेळी मुंबईहून संगमेश्वरला जाणारी स्विफ्ट कार मागून खासगी आरामबसवर धडकली. कार थेट खासगी आरामबसच्या मागील बाजूस घुसून आतमध्येच अडकली. अपघाताबाबत माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

अपघातांची मालिका सुरूच..
भरणेनजीक अपघातांची मालिका कायमच आहे.  गेल्या आठवडाभरात ८ अपघात घडले असून यामध्ये एका प्राणांतिक अपघाताचाही समावेश आहे. भरणे येथे रस्त्यालगत सर्रासपणे अवजड वाहने उभी केली जात आहेत.  या वाहनांचा अंदाज येत नसल्याने वाहने पाठीमागून अवजड वाहनांवर आदळून अपघात घडत आहेत. रस्त्यालगत वाहने उभी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

Advertisement
Tags :

.