Ratnagiri Accident: मुंबई-गोवा महामार्गावर कार-दुचाकीचा भीषण अपघात
06:43 PM May 10, 2026 IST | NEETA POTDAR
Advertisement
सुहास नाटुस्कर जखमी, आपेडे फाट्याजवळील घटना
Advertisement
खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील आपेडे फाट्याजवळ शनिवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत सुहास नाटुस्कर (५७, शिवनेरी नगर, खेड) जखमी झाले.
सामाजिक कार्यकर्ते सुरज हंबीर यांनी घटनास्थळी पोहोचून जखमी दुचाकीस्वारास उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
Advertisement
कारने (एम.एच.१२/एच.व्ही.७२४१) दुचाकीला (एम.एच.०८/ए.टी.१९९८) धडक दिल्याने झालेल्या अपघातामुळे काहीकाळ वाहतूक खोळंबली. अपघाताबाबत माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. याप्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत कारचालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
Advertisement