For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Ratnagiri Khed accident: खवटीजवळ अपघात; चौघे जण जखमी

05:56 PM May 09, 2026 IST | NEETA POTDAR
ratnagiri khed accident  खवटीजवळ अपघात  चौघे जण जखमी
Advertisement

दहिसरमधील एकाच कुटुंबातील चौघे जखमी

Advertisement


खेड :
 मुंबई-गोवा महामार्गावरील खवटी रेल्वे पुलाजवळ शुक्रवारी सकाळी ११.५० वाजण्याच्या सुमारास टेम्पो ट्रॅव्हल्सला झालेल्या अपघातात चौघेजण जखमी झाले.

सामाजिक कार्यकर्ते सुरज हंबीर यांनी जखमींना उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. अनु विनायक कोलमकर (३८), त्रिशा अनिल सिंग (८), गुंजन अनिल सिंग (११), अनिल श्रीशंकर सिंग (३८, सर्व रा. दहिसर-मुंबई) अशी जखमींची नावे आहेत.

Advertisement

टेम्पो ट्रॅव्हल्स मुंबई येथून गणपतीपुळे येथे जात होता. चालकांचे नियंत्रण सुटल्याने अपघात घडला. अपघातामुळे काहीकाळ वाहतूक ठप्प झाली. अपघाताची माहिती मिळताच कशेडी येथील वाहतूक पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचून जखमींना मदतकार्य केले.

Advertisement
Tags :

.