For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खेड-जगबुडी नदीपात्रातील उर्वरित गाळ उपसणार कधी?

01:37 PM Dec 02, 2024 IST | Pooja Marathe
खेड जगबुडी नदीपात्रातील उर्वरित गाळ उपसणार कधी
"Khed-Jagbudi River Silt Removal Update"
Advertisement

नागरिकांचा सवाल
पावसाळ्यापूर्वी ५ हजार घनमीटर उपसला गाळ, पावसाळ्यानंतर अद्याप गाळउपसा रखडला
रत्नागिरी

Advertisement

शहरातील जगबुडी नदीपात्रातील गाळ उपसण्यासह बेटे काढण्यासाठी आमदार योगेश कदम यांच्या विशेष प्रयत्नाने २ कोटी ८४ लाख रुपयांचा निधी मंजूर होताच गाळ उपसण्यास सुरुवात झाली. पावसाळ्यापूर्वी ५ हजार घनमीटर गाळ उपसाही करण्यात आला. तरीही यंदाच्या पावसाळ्यात पुराची टांगती तलवार कायम राहिली. जगबुडी नदीपात्रातील उर्वरित गाळ उपसा कधी करणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

बारमाही वाहणाऱ्या जगबुडी नदीपात्रात गाळ साचला होता. बरीच वर्षे गाळ उपसा न केल्याने दरवर्षी पुराची टांगती तलवार कायम होती. जगबुडीच्या पुराचे पाणी बाजारपेठेत घुसून व्यापाऱ्याऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत होता. यामुळे शहर व्यापारी संघटनेने आमदार योगेश कदम यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत गाळ उपसण्यासाठी आग्रह धरला होता. आमदार योगेश कदम यांनीही या बाबत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करत नदीपात्रातील गाळ उपसण्यासह बेटे काढण्यासाठी २ कोटी ८४ लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला.

Advertisement

हा निधी प्राप्त होताच अलोरे जलसंपदा यांत्रिकी विभागामार्फत २ पोकलेनच्या सहाय्याने दिवसाला २०० ब्रास गाळ उपसण्यात आला होता. २ महिन्याच्या कालावधीत ५ हजार घनमीटर गाळ उपसा करण्यात आला. पाऊस सुरू होताच गाळ उपसण्याच्या प्रक्रियेला 'ब्रेक' लागला होता.

पाऊस संपल्यानंतर जगबुडी नदीपात्रातील गाळ उपसण्याची प्रक्रिया सुरू होईल, असे सांगण्यात आले होते मात्र २ महिन्यांचा कालावधी लोटूनही अद्याप गाळ उपसण्यास सुरुवात झालेली नाही नदीपात्रातील गाळ उपसण्याची प्रक्रिया सुरू होणार तरी कधी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या बाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे संपर्क साथला असता होवू शकला नाही.

Advertisement
Tags :

.