For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Khed Gram Panchayat | खेड ग्रामपंचायत अपहार प्रकरण: आमदार महेश शिंदे यांच्यावर भ्रष्टाचाराचे समर्थन केल्याचा ग्रामस्थांचा थेट आरोप

12:44 PM Jun 01, 2026 IST | NEETA POTDAR
khed gram panchayat   खेड ग्रामपंचायत अपहार प्रकरण  आमदार महेश शिंदे यांच्यावर भ्रष्टाचाराचे समर्थन केल्याचा ग्रामस्थांचा थेट आरोप
Advertisement

                      खेड ग्रामपंचायतीतील 17 लाखांच्या अपहारावरून राजकारण तापले

Advertisement

खेड- खेड ग्रामपंचायतीतील कथित पावणे १७ लाख रुपयांच्या आर्थिक अपहार प्रकरणात अपात्र ठरलेल्या सरपंच लता फरांदे यांना आमदार महेश शिंदे पाठीशी घालत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी पत्रकार परिषदेत केला. माजी सभापती मिलिंद कदम, माजी सरपंच सुजीत पवार व अन्य ग्रामस्थांनी आमदार शिंदे भ्रष्टाचाराचे समर्थन करत असल्याचा दावा केला.

ग्रामपंचायतीतील अपहार, विकासकामांतील अनियमितता आणि टक्केवारीच्या आरोपांची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच ग्रामनिधीतील भ्रष्टाचाराबाबत आमदारांनी दिलेले आव्हान स्वीकारत, खुल्या चर्चेसाठी वेळ व ठिकाण जाहीर करण्याचे प्रतिआव्हानही ग्रामस्थांनी दिले. ग्रामपंचायतीतील पावणे १७ लाखांचा अपहार हा केवळ ‘ट्रेलर’ असून आणखी अनेक गैरव्यवहार समोर आणणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

Advertisement

Advertisement
Tags :

.