For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खवड्या डोंगर दुर्घटना : तिघांवर वेगवेगळ्या ठिकाणी अंत्यसंस्कार, अस्थी विसर्जन मात्र एकत्र; कौटुंबिक वादाचे व्हिडीओ चर्चेत

11:11 AM Aug 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
खवड्या डोंगर दुर्घटना   तिघांवर वेगवेगळ्या ठिकाणी अंत्यसंस्कार  अस्थी विसर्जन मात्र एकत्र  कौटुंबिक वादाचे व्हिडीओ चर्चेत
Advertisement

छत्रपती संभाजीनगर : खवड्या डोंगरावरून उडी घेत आत्महत्या केल्याच्या घटनेत मुरलीधर चांदगुडे, त्यांची पत्नी संगीता चांदगुडे आणि मुलगा कुणाल चांदगुडे या तिघांचा मृत्यू झाला होता. तिघांवर वेगवेगळ्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र, रविवारी (२३ ऑगस्ट) पैठण येथील गोदावरी नदीच्या पात्रात तिघांच्याही अस्थी आणि रक्षा एकत्र विसर्जित करण्यात आली.

Advertisement

मुरलीधर चांदगुडे यांच्यावर त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले, तर संगीता आणि कुणाल यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर रविवारी संगीता आणि कुणाल यांच्या अस्थी घेऊन त्यांचे नातेवाईक पैठण येथे पोहोचले. त्याचवेळी मुरलीधर यांच्या अस्थी घेऊन त्यांचे आई-वडील आणि बहिणीही पैठण येथे आल्या. त्यानंतर तिघांच्या अस्थी आणि रक्षा एकत्र गोदावरी नदीत विसर्जित करण्यात आली.

दरम्यान, चांदगुडे कुटुंबीयांशी संबंधित काही व्हिडीओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित होत असून, त्यातून कुटुंबातील कथित वादाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. या व्हिडीओमध्ये मुरलीधर यांच्या बहिणी शोभा राजेंद्र म्हस्के यांनी कुटुंबातील काही घटनांचा उल्लेख केला आहे.

Advertisement

शोभा म्हस्के यांनी सांगितले की, चार बहिणींमध्ये मुरलीधर हे एकमेव भाऊ होते. त्यांच्या मुलाच्या विवाहासाठी मुरलीधर गावाकडे आले होते. त्यानंतर एका बहिणीच्या मुलाचे निधन झाल्याने ते सुमारे दहा दिवस गावात थांबले होते. या कारणावरून मुरलीधर आणि त्यांच्या पत्नीमध्ये वाद झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.

मुरलीधर यांची दीड महिन्यापूर्वी भेट झाली होती, असेही शोभा म्हस्के यांनी व्हिडीओमध्ये सांगितले आहे. दरम्यान, सामाजिक माध्यमांवर प्रसारित होत असलेल्या व्हिडीओमधील दाव्यांची स्वतंत्र पुष्टी झालेली नसून, या घटनेमागील नेमकी कारणे तपासातूनच स्पष्ट होणार आहेत.

Advertisement
Tags :

.