For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ओरोसमध्ये 10 एप्रिल पासून 'खासदार चषक' क्रिकेट स्पर्धा

11:48 AM Mar 29, 2026 IST | अनुजा कुडतरकर
ओरोसमध्ये 10 एप्रिल पासून   खासदार चषक  क्रिकेट स्पर्धा
Advertisement

विजेत्या संघाला मिळणार 1 लाखाचे पारितोषिक

Advertisement

प्रतिनिधी ओरोस

मयूर राणे मित्र मंडळ ओरोसच्या वतीने 10 ते 14 एप्रिल या कालावधीत सिंधुदुर्गनगरी येथील क्रीडा संकुल मैदानावर खासदार चषक अंतर्गत खुल्या ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेचे 10 एप्रिल पासून आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा शुक्रवार दिनांक 10 एप्रिल रोजी खासदार नारायण राणे यांच्या हस्ते होणार आहे. विजेत्या संघास 1,0026 रु तर उपविजेत्या संघास 50,026 रुपये आणि उपांत्य फेरी पराभूत संघास 5,026 रुपये प्रोत्साहन पारितोषिक दिले जाणार आहे. माजी केंद्रीय मंत्री व खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, उपाध्यक्ष दादा साईल, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, शिवसेना महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष दीपलक्ष्मी पडते, जिल्हा परिषद सदस्य सुप्रिया वालावलकर यांचीही उपस्थिती राहणार आहे. सर्व सामने सकाळी नऊ वाजल्यापासून सुरू होणार असून खेळाडूंना ट्रॅक पॅन्ट व शूज हा ड्रेस कोड अनिवार्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. इच्छुक संघांनी अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी 9226879279 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.