For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

न्याय मिळाल्यानंतर खानयाळे ग्रामस्थांचे आठव्या दिवशी अखेर उपोषण मागे

03:14 PM Mar 13, 2025 IST | अनुजा कुडतरकर
न्याय मिळाल्यानंतर खानयाळे ग्रामस्थांचे आठव्या दिवशी अखेर उपोषण मागे
Advertisement

पालकमंत्री नितेश राणे यांची मध्यस्थी ठरली निर्णायक,मनीष दळवी यांच्या हस्ते देण्यात आले पत्र.

Advertisement

(साटेली भेडशी प्रतिनिधी)

तिलारी धरणाच्या पाण्यालगत शिरंगे हद्दीत सुरू असलेले काळ्या दगडाचे उत्खनन कायमस्वरूपी बंद होण्याच्या मागणीसाठी गुरुवार पासून सुरू असलेले उपोषण अखेर न्याय मिळाल्यानंतर आठव्या दिवशी गुरुवारी पालकमंत्री नितेश राणे यांची मध्यस्थीने व त्यांच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी उपोषणस्थळी सकाळीच दाखल होत उपोषणकर्त्यांशी चर्चा करीत उत्खनन होत असलेल्या खाणी कायमस्वरूपी बंद करण्याबाबतचे लेखी पत्र दिले त्यानंतर हे उपोषण मागे घेत असल्याचे खानयाळे ग्रामस्थांनी जाहीर केले.

Advertisement

यावेळी श्री.दळवी यांच्यासोबत भाजपा दोडामार्ग तालुकाध्यक्ष सुधीर दळवी,कसईदोडामार्ग माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक संतोष नानचे,कसईदोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण, जि. प.माजी उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर,भाजपा कार्यकारिणी सदस्य सिद्धेश पांगम, पांडुरंग बेळेकर,पराशर सावंत दोडामार्ग हेल्पलाईन अध्यक्ष वैभव इनामदार, नायब तहसीलदार प्रज्ञा राजमाने, मंडळ अधिकारी राजन गवस आदी उपस्थित होते.न्याय मिळाल्याने खानयाळे ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करीत उपोषणदरम्यान सहकार्य केलेल्या प्रशासन,लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते,पत्रकार यांचे आभार मानले.

Advertisement
Tags :

.