For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खंडोबा-प्रॅक्टीस बरोबरीत! संध्यामठची सम्राटनगरवर मात

08:13 PM Dec 21, 2023 IST | Abhijeet Khandekar
खंडोबा प्रॅक्टीस बरोबरीत  संध्यामठची सम्राटनगरवर मात
Khandoba-Practice
Advertisement

केएसए शाहू छत्रपती फुटबॉल लीग

कोल्हापूर प्रतिनिधी

केएसए शाहू छत्रपती लीग फुटबॉल स्पर्धेत गुरूवारी सायंकाळी खंडोबा तालीम मंडळ विरूद्ध प्रॅक्टीस फुटबॉल क्लब यांच्यातील सामना 2-2 बरोबरीत राहीला. तत्पुर्वी, दुपारी झालेल्या सामन्यात संध्यामठ तरूण मंडळाने सम्राटनगर स्पोर्टस्वर 2 गोलने विजय मिळवला. छत्रपती शाहू स्टेडियमवर हे सामने झाले.

Advertisement

सायंकाळच्या सत्रात खंडोबा तालीम व प्रॅक्टीक्स क्लबमध्ये चुरशीचा सामना झाला. दोन्ही संघांकडून आक्रमक चढायांना प्रारंभ करण्यात आला. सामान्याच्या 16 व्या मिनिटाला खंडोबाच्या सोनू हलदरने डी बाहेरून मारलेल्या जोरदार फटक्याने गोलपोस्टचा अचूक वेध घेतला. या गोलने खंडोबाने सामन्यात आघडी घेतली. मात्र खंडोबाची हि आघाडी फारकाळा टिकली नाही. 20 व्या मिनिटाला प्रॅक्टीसच्या राहूल पाटीलने दिलेल्या पासवर राजा छेत्रीने गोल करत सामना बरोबरीत आणला. यानंतर 40 व्या मिनिटाला खंडोबाच्या कुणाल दळवीच्या पासवर केवल कांबळेने गोल नोंदवत संघाला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. पुर्वाधात खंडोबाचा संघ आघाडीवर राहिला.

उत्तरार्धात गोलची परतफेड करत सामना बरोबरीत आणण्यासाठी प्रॅक्टीसच्या साहील डाकवे, जिग्नेश, दर्शन पाटील, आकाश बावकर, प्रतिक बेडेकर यांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र खंडोबाच्या संकेत जरग, प्रभू पोवार, संकेत मेढे, केवल कांबळे, कुणाल दळवी या बचावफळीने प्रॅक्टीच्या चढाया रोखून धरत त्यांचे प्रयत्न फोल ठरविले. समान्यात 65 व्या मिनिटाला गोलपोस्टजवळ उडालेल्या गोंधळाचा फायदा घेत प्रॅक्टीसच्या ओंकार जाधवने गोलची नोंद करत सामना 2-2 असा बरोबरीत आणला. यांनतर दोन्ही संघाकडुन वेगवान चढाया करण्यात आल्या, पण गोलची नोंद होऊ न शकल्याने सामना 2-2 असा बरोबरीत सुटला.

Advertisement

संध्यामठचा 2-0 गोलफरकाने विजय
दुपारच्या सत्रात झालेल्या सामन्यात संध्यामठने सम्राटनगर स्पोर्ट्सवर दोन गोलनी विजय मिळविला.सामान्याच्या पुर्वाधात दोन्ही संघाकडून गोलची नोंद झाली नाही. उत्तरार्धात संध्यामठच्या कपील शिंदेने 41 व्या मिनिटाला गोल करत संघास आघाडी मिळवून दिली. यानंतर 57 व्या मिनिटाला प्रवीण साळोखे याने गोल करत संघाची आघाडी 2-0 अशी भक्कम केली. संध्यामठकडून हर्ष जरग, आशिष पाटील, स्वराज सरनाईक, सुभाष ओरॉन यांनी आक्रमक खेळ केला. तर सम्राटकडून अर्जून साळोखे, शुभम दरवान, यशराज थापा, उत्कर्ष देशमुख यांनी गोल करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश आले नाही.

Advertisement
Tags :

.