Khandala News | खंडाळ्याला वादळी पावसाचा मोठा तडाखा! झाडे उन्मळून पडली, वीज यंत्रणा कोलमडली; लाखो रुपयांचे नुकसान
खंडाळा : खंडाळा शहराबरोबर पश्चिम भागात वादळी वाऱ्यासह पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. बादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. तर केसुर्डीत पत्र्याचे शेड उडून गेल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून काही ठिकाणी वीजेचे खांब वाकल्याने बीज यंत्रणाकोलमडली असल्याचे दिसून आले. गुरुवारी दुपारी ३.३० च्या सुमारास ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. मात्र, सकाळपासून उकड्याने हैराण झालेले नागरिक पावसाच्या प्रतिक्षेत असताना विजांच्या कडकडाटासह व तीब्र मेघगर्जनेने पावसाला सुरुवात झाली.
यावेळी सुटलेल्या प्रचंड वादळी झयामुळे रस्त्यावरील दुकाने, पादचारी आणि वाहनचालक यांची तारांबळउडाल्याचे पहायला मिळाले. वादळामुळे ठिकठिकाणी बीजेचे खांब बाकले आहेत. तांत्रिक बिघाडामुळे संपूर्ण खंडाळा शहर आणि परिसराचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्खंडाळा ते असवली जाण्प्रया रस्त्यावर तर महामार्गावर बसस्थानका नजिक सेवा रस्त्यावर वृक्ष उन्मळून पडल्याने काही वेळ बाहतूक विस्कळीत झाली होती. रस्त्यावर पडलेली झाडेबाजूला सारून रस्ते बाहतुकीसाठी मोकळे करण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरू होते.
नायगाव, केसुर्डीमध्ये जोरदार पाऊस झाला. पांडुरंग जाधव (केसुर्डी) यांच्या शिताफळ बागेवर पत्राशेड पडल्याने झाडांचे तर गावातील अन्य पाच ते ठिकाणी पत्र्याचे शेड उडून गेल्यामुळे सुमारे सहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे.