कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बेळगाव महामेळाव्याला खानापूर म. ए. समितीचा पाठिंबा

11:13 AM Dec 02, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मोठ्या संख्येने महामेळाव्याला उपस्थित राहण्याचा निर्धार

Advertisement

खानापूर : कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन दि. 8 डिसेंबरपासून सुवर्णसौध बेळगाव येथे होणार आहे. या अधिवेशनाला विरोध म्हणून सोमवार दि. 8 डिसेंबर रोजी मध्यवर्ती म. ए. समितीकडून महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला खानापूर तालुका म. ए. समितीने पाठिंबा जाहीर केला असून तालुक्यातील मराठी भाषिक नागरिक या महामेळाव्यास मोठ्या संख्येने सहभागी होणार, असा निर्धार खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत करण्यात आला. खानापूर तालुका म. ए. समितीची महत्त्वपूर्ण बैठक सोमवारी शिवस्मारक येथे पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी समिती अध्यक्ष गोपाळराव देसाई होते.

Advertisement

4 डिसेंबर रोजी होणाऱ्या राष्ट्रवीरकार गुरुवर्य शामराव देसाई पुरस्कार वितरण सोहळ्dयास खानापूर तालुक्यातील जनतेने बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन  करण्यात आले. बैठकीनंतर खानापूर शहरातील मुख्य बाजारपेठेत मेळाव्यासंदर्भात पत्रके वाटून जनजागृती करण्यात आली. त्यानंतर ज्ञानेश्वर मंदिर खानापूर येथे निवृत्त शिक्षक संघटनेची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या ठिकाणी जाऊन महामेळाव्यासंदर्भात समिती पदाधिकाऱ्यांनी जनजागृती केली व दि. 4 डिसेंबर रोजी होणाऱ्या राष्ट्रवीरकार गुरुवर्य शामराव देसाई पुरस्कार सोहळ्dयास निवृत्त शिक्षकांनी देखील मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले.

बैठकीला कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील, चिटणीस आबासाहेब दळवी, ज्येष्ठ नेते विलास बेळगावकर, खजिनदार संजय पाटील, प्रकाश चव्हाण, राजाराम देसाई, अमृत शेलार, बी. बी. पाटील, विठ्ठल गुरव, प्रभाकर बिरजे, विनायक चव्हाण, जयराम देसाई, शंकर सडेकर, म्हात्रू धबाले, वसंत नावलकर, मरू पाटील, ए. एम. पाटील, डी. एम. भोसले, वाय. बी. पाटील, जे. बी. पाटील, एस. बी. पाटील, एम. जी. पाटील, सी. एल. सुतार, व्ही. एल. पाटील, विठ्ठल हट्टीकर, एम. जी. घाडी, एस. व्ही. जाधव, एम. ए. खांबले, एन. जे. गुरव, बी. एन. पाटील, एन. एम. पाटील आदी उपस्थित होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article