For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तीन महिन्यांनंतर होणार खामेनींवर अंत्यसंस्कार

07:00 AM Jun 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
तीन महिन्यांनंतर होणार खामेनींवर अंत्यसंस्कार
Advertisement

21 जून रोजी अंत्यविधी अपेक्षित : इराणमधील मशहद शहरात दफन केले जाणार,अंत्यविधीला 2 कोटी लोकांच्या हजेरीची अपेक्षा

Advertisement

वृत्तसंस्था/तेहरान

इराणचे माजी सर्वोच्च नेते, अयातुल्ला अली खामेनी यांना त्यांच्या मृत्यूनंतर सुमारे तीन महिन्यांनंतर दफन केले जाईल. त्यांच्या अखेरच्या इच्छेनुसार, खामेनी यांना मशहद येथील शिया इस्लाममधील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व असलेल्या इमाम रझा यांच्या पवित्र दर्गा संकुलाजवळ दफन केले जाईल. इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (आयआरजीसी) नुसार, खामेनी यांचा अंत्यविधी 21 जून रोजी अपेक्षित आहे. खामेनींना अखेरचा निरोप देण्यासाठी आणि श्रद्धांजली वाहण्यासाठी तीन पूर्ण दिवस राखून ठेवण्यात आले आहेत. तेहरान, कोम आणि मशहद येथील अंत्यदर्शन सोहळ्यांना सुमारे 2 कोटी लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. 28 फेब्रुवारी रोजी तेहरानमधील त्यांच्या निवासस्थानावर झालेल्या अमेरिकी-इस्रायली हल्ल्यात ते मारले गेले होते.

Advertisement

खामेनी यांचा शासकीय अंत्यसंस्कार मूलत: 4 मार्च रोजी नियोजित होता, परंतु युद्धामुळे तो पुढे ढकलण्यात आला होता. आता खामेनी यांचा मुख्य अंत्यविधी सोहळा साडेतीन महिन्यांनंतर तेहरानमध्ये पार पडेल आणि तो किमान 24 तास चालण्याची शक्यता आहे. त्यानंतर पार्थिव शरीर धार्मिक शहर कोम आणि नंतर मशहद येथे नेले जाईल. तेथील इमाम रझा दर्गा संकुलात त्यांच्यावर दफनविधी केला जाईल, असे तेहरानच्या एका महानगरपालिका अधिकाऱ्याने सांगितले. दफनविधीपूर्वी खामेनी यांचे पार्थिव शरीर कोम आणि मशहदच्या रस्त्यांवरून अंत्ययात्रा काढून नेले जाईल, असेही आयआरजीसीच्या एका निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

गर्दीचा विक्रम प्रस्थापित होण्याची शक्यता

जर खामेनी यांच्या अंत्यविधीला 2 कोटी लोक उपस्थित राहिले, तर इस्लामिक प्रजासत्ताकाचे संस्थापक अयातुल्ला रुहोल्ला खोमेनी यांच्यासाठी 1989 मध्ये प्रस्थापित झालेला विक्रम मोडला जाईल. 1989 मध्ये अयातुल्ला रुहोल्ला खोमेनी यांच्या अंत्यविधीला अंदाजे 1 कोटी लोक उपस्थित होते. हा आकडा त्यावेळच्या इराणच्या एकूण लोकसंख्येच्या अंदाजे एक-षष्ठांश इतका होता. त्यावेळी अंत्ययात्रेत चेंगराचेंगरीही झाली होती.

Advertisement
Tags :

.