टॅफिक कॅमेरे हॅक करत खामेनेई टार्गेट
इस्रायलच्या मोसादची थक्क करणारी मोहीम : अनेक वर्षांपर्यंत ठेवली नजर
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांचा शनिवारी इस्रायलच्या हवाईहल्ल्यात मृत्यू झाला. हा हल्ला तेहरानच्या पास्चर स्ट्रीटनजीकच्या त्यांच्या कार्यालयावर झाला, जेथे ते अनेक वरिष्ठ इराणी नेत्यांसोबत बैठक करत होते. या हल्ल्याकरता इस्रायलने कार्यालयावर 30 क्षेपणास्त्रs पाडविली होती, या हल्ल्यात खामेनेई यांच्यासोबत 40 अधिकारीही मारले गेले आहेत.
इस्रायलने अनेक वर्षांपासून अशाप्रकारच्या हल्ल्याची तयारी केली होती. इस्रायलची गुप्तचर यंत्रणा मोसाद आणि यूनिट 8200 ने तेहरानच्या जवळपास सर्व ट्रॅफिक कॅमेऱ्यांना हॅक केले होते. या कॅमेऱ्यांची छायाचित्रे एन्क्रिप्ट करत तेल अवीव आणि दक्षिण इस्रायलच्या सर्व्हर्सवर पाठविली जात होती. अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा सीआयएने देखील या अभियानात मदत केली. यात एक खास कॅमेरा होता, ज्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सुरक्षारक्षक आणि चालक स्वत:ची वाहने कुठे पार्क करतात हे कळत होते.
फोन टॉवर्स हॅक
या कॅमेऱ्यांमुळे इस्रायलला इराणच्या अधिकाऱ्यांविषयी भरपूर माहिती मिळाली. यात अधिकाऱ्यांचे निवासस्थान कुठे आहे, ते कधी कामावर येतात, कुठला मार्ग निवडतात आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे कुठल्या नेत्याची सुरक्षा करतात किंवा कुणाला घेऊन जातात हे कळले. याला इंटेलिजेन्समध्ये ‘पॅटर्न ऑफ लाइफ‘ म्हटले जाते. ही माहिती इस्रायलला खामेनेईंच्या हत्येसाठी अत्यंत उपयुक्त ठरली. ही एकमात्र पद्धत नव्हती. इस्रायल आणि सीआयएने अनेक प्रकारची गोपनीय माहिती जमविली होती. इस्रायलने पास्चर स्ट्रीटचय आसपासच्या मोबाइल फोन टॉवर्सनाही टॅक केले होते, जेणेकरून हल्ल्यावेळी फोन व्यग्र दिसावेत आणि इराणच्या सुरक्षा टीमला कुठलाही इशारा मिळू नये.
इराणच्या कानाकोपऱ्याबद्दल माहिती
तेहरानला आम्ही तितक्याच चांगल्याप्रकारे जाणतो, जितके चांगल्याप्रकारे जेरूसलमेला ओळखतो. जेव्हा तुम्ही एखाद्या ठिकाणाला इतक्या चांगल्याप्रकारे जाणत असाल तर तेथील कुठलीही छोटी गडबडही नजरेस पडत असल्याचे उद्गार इस्रायलच्या एका गुप्तचर अधिकाऱ्याने काढले आहेत. ही कामगिरी इस्रायलचे यूनिट 8200 (सिग्नल इंटेलिजेन्स), मोसादच्या ह्युमन सोर्स आणि मिलिट्री इंटेलिजेन्सच्या डाटामुळे शक्य झाली. या यंत्रणांनी सोशल नेटवर्क अॅनालिसिस नावाच्या गणितीय प्रक्रियेद्वारे अब्जावधी डाटा पॉइंट्सची छाननी केली आणि नवी टार्गेट्स शोधली आहेत. इस्रायलमध्ये टार्गेटिंग इंटेलिजेन्स अत्यंत आवश्यक आहे. जर एखाद्याला ठार करायचा निर्णय झाल्यास इंटेलिजेन्स तो पूर्ण करण्यासाठी तयार होते.
स्पॅरो क्षेपणास्त्राचा वापर
इस्रायलने इराणवरील हल्ल्याकरता स्पॅरो नावाच्या खास क्षेपणास्त्राचा वापर केला आहे. हे क्षेपणास्त्र 1 हजार किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर असलेल्या डायनिंग टेबल इतक्या छोट्या लक्ष्याचाही भेद करू शकते. हे क्षेपणास्त्र इराणच्या कुठल्याही हवाई सुरक्षा यंत्रणेला रोखणे शक्य नव्हते.
माझ्या मृत्यूने फरक पडत नाही!
खामेनेई यांची हत्या एक राजकीय निर्णय होता, केवळ तंत्रज्ञानाची कमाल नव्हता. खामेनेई हे शनिवारी स्वत:च्या कार्यालयात बैठक घेणार आहेत आणि यात अनेक वरिष्ठ नेते उपस्थित राहणार असल्याचे कळताच सीआयए आणि इस्रायलला ही नामी संधी वाटली. कारण थेट युद्ध सुरू झाल्यावर खामेनेई यांना शोधून काढणे अवघड ठरले असते, कारण ते बंकर्समध्ये लपले असते. खामेनेई हे हिजबुल्लाहचा म्होरक्या हसन नसरल्लाहप्रमाणे लपून राहत नव्हते. नसरल्लाह कित्येक वर्षांपासून बंकरमध्ये राहत होता. परंतु खामेनेई यांनी जाहीरपणे माझ्या मृत्यूने फरक पडत नसल्याचे म्हटले होते.