महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

खलिस्तानी दहशतवादी पन्नूची राम मंदिर उडवण्याची धमकी

06:35 AM Nov 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

व्हिडिओ जारी : अयोध्येत हिंसाचार माजवण्याचा इशारा

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisement

शीख फॉर जस्टिसचा स्वयंघोषित प्रमुख आणि खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने अयोध्येतील श्रीराम मंदिरासह इतर धार्मिक स्थळांवर हल्ला करण्याची धमकी दिली आहे. गुरपतवंत सिंग पन्नू याने एक व्हिडिओ जारी करून राम मंदिर उडवून देण्याचा इशारा दिला आहे. तसेच सदर व्हिडिओमध्ये पन्नूने पॅनडाचे हिंदू खासदार चंद्रा आर्य यांनाही धमकी दिली आहे.

पॅनडाच्या प्रक्षोभामुळे खलिस्तानवाद्यांची हिंमत एवढी वाढली आहे की त्यांनी आता हिंदूंचे सर्वात मोठे श्र्रद्धास्थान असलेल्या अयोध्येतील राम मंदिराला लक्ष्य करण्याची धमकी दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शीख फॉर जस्टिस या प्रतिबंधित संघटनेचा प्रमुख गुरपतवंत सिंग पन्नू याने 16 आणि 17 नोव्हेंबर रोजी हल्ल्याचा इशारा दिला आहे. तसेच त्याने हिंदू धार्मिक स्थळांवर हिंसाचार माजवणार असल्याचेही व्हिडिओमध्ये म्हटले आहे. गेल्या महिन्याच्या सुऊवातीला पन्नूने प्रवाशांना एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये उ•ाण न करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर आता पन्नू याने आपल्या वक्तव्यात आम्ही हिंसक हिंदुत्व विचारसरणीची जन्मभूमी असलेल्या अयोध्येचा पाया हादरवून टाकू, असेही स्पष्ट केले. अयोध्येतील राम मंदिर 22 जानेवारी 2024 रोजी जनतेसाठी खुले करण्यात आले होते. उद्घाटन सोहळ्याला पंतप्रधान मोदी आणि हजारो मान्यवर उपस्थित होते.

खलिस्तानवाद्याकडून यापूर्वीही इशारे

पन्नूने पहिल्यांदाच भारताला कोणतीही धमकी दिली असे नाही. याआधी खलिस्तानी दहशतवादी पन्नू याने भारताला धमकी देत विमान बॉम्बस्फोटाने उडवण्याचा इशारा दिला होता. शीख दंगलीला 40 वर्षे पूर्ण होत असताना एअर इंडियाच्या विमानावर हल्ला होऊ शकतो, असे पन्नू म्हणाला होता. पन्नू याने आंतरराष्ट्रीय प्रवाशांना 1 ते 19 नोव्हेंबर या कालावधीत एअर इंडियाच्या विमानातून प्रवास न करण्याचा इशारा दिला होता.

भारतातून फरार होत विदेशात आश्रय

पंजाबमध्ये जन्मलेला गुरपतवंत सिंग पन्नू भारतातून फरार झाला असून सध्या परदेशात आहे. कधी तो पॅनडा तर कधी अमेरिकेत राहतो. त्याच्याकडे या दोन्ही देशांचे नागरिकत्व आहे. त्याने विदेशातूनच भारतात दहशतवादी हल्ले करण्याची धमकी दिली. पन्नूने पंजाब विद्यापीठ, चंदीगड येथून कायद्याचे शिक्षण घेतले आहे. त्याने 2007 मध्ये ‘शीख फॉर जस्टिस’ ही संघटना स्थापन केली होती. जुलै 2020 मध्ये भारताने पन्नूला दहशतवादी घोषित केले होते. पन्नू आयएसआयच्या मदतीने खलिस्तान मोहीम चालवत आहे.

1947 मध्ये फाळणीनंतर पन्नूचे कुटुंब पाकिस्तानातून अमृतसरमधील खानकोट गावात आले. पन्नू याचा जन्म 14 फेब्रुवारी 1967 रोजी झाला. पन्नूचे वडील पंजाबमध्ये एका कंपनीत काम करत होते. त्याला एक भाऊ असून तोसुद्धा परदेशात राहतो. त्याचे आई-वडील मरण पावले आहेत.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article