For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खलिस्तानी दहशतवादी पन्नूची भारताला धमकी

06:33 AM Apr 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
खलिस्तानी दहशतवादी पन्नूची भारताला धमकी
Advertisement

लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान, संरक्षण मंत्र्यांना

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने पुन्हा एकदा भारताविरोधात विष ओकले आहे. पन्नूने एक व्हिडिओ जारी करून भारताला धमकी दिली असून त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना इशारा देण्यात आला आहे. सदर व्हिडिओमध्ये आपली संघटना शीख फॉर जस्टिस जनमतासाठी काम करत राहील आणि भारत सरकारविरोधात आवाज बुलंद करेल, असे पन्नूने म्हटले आहे. 19 एप्रिलपासून भारतात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीदरम्यान पन्नूने पंतप्रधान मोदींविरोधात मोठा कट रचल्याची माहितीही गुप्तचर यंत्रणांना प्राप्त झाली आहे.

Advertisement

नुकत्याच जारी करण्यात आलेल्या पन्नूच्या जवळपास तीन मिनिटांच्या व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदी आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची वक्तव्येही दाखवण्यात आली आहेत. एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी भारताविऊद्ध षड्यंत्र रचण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर सरकार कठोर कारवाई करेल, असा इशारा दिला होता. तसेच पंतप्रधान मोदींनी एका सभेला संबोधित करताना ‘आजचा भारत हा नवा भारत आहे, जो कोणी भारताच्या विरोधात काम करतो त्याच्या घरात घुसून त्याला मारतो.’ असे म्हटले होते. या दोन्ही नेत्यांच्या या इशाऱ्यानंतर पन्नूने व्हिडिओ जारी करत भारताला धमकावण्याचा प्रयत्न केला आहे.

Advertisement
Tags :

.