For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खजानाभविष्य

06:12 AM Jun 25, 2025 IST | Tarun Bharat Portal
खजानाभविष्य
Advertisement

(सध्या घडत असलेल्या अनेक अप्रिय घटना, विमान अपघात, हल्ले, युद्ध, याबद्दल अनेक वाचकांनी फोनद्वारे, प्रत्यक्ष भेटून विचारणा केली. 25 जूनला अनेक ग्रह राहूच्या नक्षत्रात येत आहेत. संक्रमणाचे आजार, भ्रम, गैरसमज, नैसर्गिक/मानव निर्मित आपत्ती यांचा हा योग आहे. एक सांगावेसे वाटते, 1949 साली अमेरिकेच्या वायुसेनेत (US Air Force) इंजिनिअर एडवर्ड मर्फी (Edward A. Murphy Jr.) यांनी एक नियम मांडला "If there's any way they can do it wrong, they will."  ` ‘जे काही चुकीचे होऊ शकते, ते चुकीचे होईलच.’ उपहासात्मक पद्धतीने सांगतो की, कोणतीही गोष्ट ज्या वेळेला चुकू नये असे वाटते, नेमकी त्याच वेळेला ती चुकते आणि अशा चुकण्याचा योग जसा जसा टाळायला जाल, तसतशी ती चूक होण्याची शक्मयता वाढते! उदा. छत्री सोबत घेतली की, पाऊस येत नाही! पण विसरलात की लगेच येतो! त्यामुळे जास्त विचार न करता येणारा क्षण आनंदात कसा घालवता येईल, हे आपल्या हातात आहे. तरीही काही महत्त्वाच्या तारखा इथे देत आहे! या तारखांना प्रवास, महत्त्वाची कामे शक्मयतो टाळावीत. टाळणे अगदीच अशक्मय असल्यास आपल्या इष्ट देवतेला स्मरून पुढे जावे. जून 28, 29, जुलै 1, 4, 9, 13, 17, 18, 22, 30 अंकशास्त्रामध्ये प्रत्येक मूलांकांना (Birth Number) विशिष्ट कंपन आणि ऊर्जा असते. कोणत्याही व्यक्तीचा जन्म दिनांक (1 ते 31) घेतला जातो आणि त्याचा एक अंकी आकडा काढून तो त्या व्यक्तीचा मूलांक समजला जातो. उदा. 13 तारखेला जन्मलेल्याचा मूलांक  1+3 = 4. प्रत्येक मूलांकाला विशिष्ट ग्रहाचे अधिपत्य असते आणि त्या ग्रहाच्या गुणधर्मांनुसार व्यक्तीच्या स्वभाव, प्रवृत्ती, विचारसरणी आणि जीवनपद्धती ठरते. चला तर मग जाणून घेऊया मूलांक 1 ते 9 चे सविस्तर गुणविशेष.

Advertisement

मूलांक 1 (सूर्य) - या मूलांकावर सूर्याचा प्रभाव असतो. हे लोक जन्मत:च नेतृत्वगुण असलेले, स्वाभिमानी आणि महत्त्वाकांक्षी असतात. स्वत:च्या मार्गाने चालणे आणि स्वतंत्र विचारसरणी ही यांची ओळख. मेहनती, आत्मविश्वासू आणि एखादे कार्य हातात घेतल्यावर ते शेवटपर्यंत पूर्ण करण्याची जिद्द यांच्यात असते. या लोकांची सामाजिक प्रतिष्ठा चांगली असते. त्यांना सतत नावीन्याचा आणि नाव कमावण्याचा ध्यास असतो. अनेक वेळा स्वभावात थोडा अहंकार आणि हट्टीपणा जाणवतो. ते प्रेमळ पण थोडे थेट बोलणारे असतात. कौटुंबिक नात्यांत बऱ्याचदा वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतात. अनुकूल अंक : 1, 3, 5, 6. शुभ रंग : केशरी, सोनेरी.

मूलांक 2 (चंद्र) - चंद्राच्या प्रभावामुळे हे लोक अत्यंत भावनाशील, कल्पक आणि सहानुभूतीशील असतात. भावना आणि मन यांच्यावर जास्त चालणारे, सौंदर्यप्रेमी आणि शांत स्वभावाचे असतात. स्वप्नाळू वृत्ती आणि काव्य, साहित्य, संगीत यामध्ये रस असतो. सहज इतरांच्या भावना समजून घेणारे आणि सहकार्य करणारे असतात. परंतु, कधीकधी मन:स्थितीत चढउतार जाणवतो. निर्णय घेण्यास हळवेपणा करतात. प्रेमसंबंधात अत्यंत निष्ठावान आणि समर्पित. अनुकूल अंक : 2, 4, 6, 7, 9. शुभ रंग : पांढरा, क्रीम, हिरवा.

Advertisement

मूलांक 3 (गुऊ) - गुऊच्या अधिपत्यामुळे हे लोक प्रामाणिक, नीतिमान आणि शिस्तप्रिय असतात. शिक्षण, धर्म, अध्यात्म आणि न्याय या क्षेत्रात स्वारस्य असते. नेतृत्व, प्रशासन आणि मार्गदर्शन गुणधर्म लाभलेले असतात. हे लोक आदर्शवादी, स्वत:च्या मतावर ठाम आणि इतरांना योग्य दिशा दाखवणारे असतात. मोठा विचार आणि समाजकार्याची जाणीव असते. बऱ्याचदा कडक पण न्यायनिष्ठ स्वभाव. प्रेमसंबंधात जबाबदार आणि प्रामाणिक. अनुकूल अंक : 1, 3, 5, 6, 9. शुभ रंग : पिवळा, केशरी.

मूलांक 4 (राहू) - राहूच्या प्रभावामुळे हे लोक हट्टी, परंपराविरोधी आणि थोडे वेगळ्या विचारसरणीचे असतात. ते नेहमी काहीतरी नवीन, चमत्कारिक आणि साहसी करायला धजावतात. यांची कल्पनाशक्ती तल्लख आणि जगाला वेगळ्या दृष्टीकोनातून पाहणारे असतात. बऱ्याचदा वादग्रस्त किंवा चर्चेचा विषय बनतात. पण एकदा ध्येय ठरवल्यावर तिथेच चिकाटीने पोहोचतात. प्रेमात थोडे गूढ स्वभावाचे आणि अतीव प्रेम करणारे. अनुकूल अंक : 1, 5, 6, 7, 8. शुभ रंग : निळा, राखाडी.

मूलांक 5 (बुध) - बुध ग्रहामुळे हे लोक चपळ, वाक्चातुर्यवान आणि हुशार असतात. संवादकौशल्य उत्तम असल्याने हे लोक कुठल्याही गटात सहज रमतात. व्यापार, लेखन, पत्रकारिता, वकिली या क्षेत्रात यशस्वी होतात. प्रत्युत्तरक्षम, हलक्मया फुलक्मया स्वभावाचे, पण थोडे चंचल. सतत नवनवीन गोष्टी जाणून घेण्याची ओढ. प्रेमसंबंधात अत्यंत रोमँटिक आणि थोडे उत्स्फूर्त. अनुकूल अंक : 1, 3, 5, 6, 9. शुभ रंग : हिरवा, राखाडी.

मूलांक 6 (शुक्र) - शुक्र ग्रहामुळे सौंदर्यप्रेम, ऐश्वर्य, कुटुंबप्रियता आणि कलात्मकता यांचा मिलाफ असतो. हे लोक प्रेमळ, मृदुभाषी आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वाचे असतात. नृत्य, संगीत, पॅशन, अभिनय, सजावट या क्षेत्रात चांगले यश मिळते. कुटुंब आणि प्रेम यांना खूप महत्त्व देणारे. बऱ्याचदा थोडे भावनावश आणि लोभस असतात. सौंदर्य आणि आलिशान जीवनशैलीची आवड असते. प्रेमात निष्ठावान पण कधी कधी थोडे व्यामिश्र्र. अनुकूल अंक : 3, 5, 6, 9. शुभ रंग : पांढरा, गुलाबी.

मेष

गुऊ ग्रहाच्या संचारामुळे आत्मविश्वास आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. 19ा20 जूनच्या दरम्यान झालेल्या ग्रह गोचरामुळे आयुष्यात नवी दिशादर्शन मिळण्याची शक्मयता आहे. कामात नव्या संधी प्राप्त होतील. आर्थिक व्यवहार सुव्यवस्थित होतील. कुटुंबात सौहार्द वाढेल, पण आरोग्याकडे काही प्रमाणात लक्ष द्या. प्रवास लाभदायक ठरू शकतो.

उपाय : मोठ्या भावाची सेवा करा.

वृषभ

तीर्थयात्रा, सहली, जवळच्या लोकांच्यासाठी केलेला प्रवास सुखद होईल. वृषभ राशीच्या नक्षत्रांत शुक्राच्या प्रभावामुळे कौटुंबिक सौख्य दिसेल. घरात एखादे शुभकार्य होऊ शकते. आर्थिक बाबी स्थिर राहतील. जुन्या प्रोजेक्टना गती मिळेल. आरोग्य सामान्यपणे चांगले राहील. मित्रपरिवारातून लाभ मिळेल. प्रेमात गोडवा वाढेल. ध्यान किंवा धार्मिक साधनेचा योग आहे.

उपाय : पांढऱ्या गाईची सेवा करा.

मिथुन

‘अपनोंसे बचोगे तो औरोंसे लढोगे’ हे ध्यानी घ्या. सूर्य मिथुन राशीत प्रवेश केल्यामुळे तुमच्या मनात ऊर्जा आणि ताजगी येईल. कामकाजात स्पष्टता व बुद्धिमत्तेचा उपयोग करता येईल. आर्थिक निर्णयांची योग्य वेळ आहे. प्रवासाचे योग आहेत. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. कुटुंबातील वाद मिटतील. आरोग्यावर थोडी काळजी घ्या. सर्जन क्षमता वाढेल. गुऊवारी शुभ योग आहे.

उपाय : वाहत्या पाण्यात तांब्याची नाणी टाका.

कर्क

अति शहाणा त्याचा बैल रिकामा, असे होऊ देऊ नका. चंद्राचा प्रभाव वाढल्यामुळे भावना तीव्र होतील. पण नक्षत्रात बदलामुळे कुटुंबात सुखप्राप्ती होईल. आर्थिक बाबीमध्ये स्थैर्य राहील. कामात वाढीची शक्मयता आहे. प्रेमात सुसंवाद वाढेल. आरोग्य सामान्यपणे चांगले राहील. सामाजिक कार्यात सहभाग लाभदायक ठरेल. प्रवास फायदेशीर ठरू शकतो. गुऊवारी पूजा-उपासना फायद्याची.

उपाय : काळे कपडे वापरू नका.

सिंह

दाखवायला जाल गुर्मी तर घाव बसेल वर्मी, म्हणून सामंजस्याने काम घ्या. शनी-गुऊ यांच्या विरोधात्मक योगामुळे स्वावलंबन वाढेल, परंतु संयमाची गरज राहील. कामात नव्या संधी निर्माण होऊ शकतात. आर्थिक स्थिती मजबूत राहील. कुटुंबात गोड वातावरण राहील. आरोग्य स्थिर राहील. प्रेमात गोडवा वाढेल. समाजात नाव कमवता येईल. प्रवासाचा योग आहे.

उपाय : मासे खाऊ नका.

कन्या

अडकलेली कामे होण्याकरता लोकांची मनधरणी करावी लागेल. भद्राच्या उपस्थितीमुळे शांतीप्रियता वाढेल आणि ग्रहगोचरामुळे कुटुंबाशी संबंध घट्ट होतील. आर्थिक बाबी सुलभ राहतील. नोकरीत किंवा व्यवसायात सन्मान मिळेल. प्रेमात संयम आवश्यक. प्रवास फायदेशीर ठरू शकतो. आरोग्य सुधारण्याची लक्षणे दिसतील. मित्रपरिवारातून मदत मिळेल.

उपाय : खोटे केव्हाही बोलू नका.

तूळ

जैसा देस वैसा भेस हे तत्त्व अनुसरा, लाभ होईल. तुळ राशीत शुक्र आणि बुध यांच्या प्रभावामुळे सौंदर्य व कलात्मकता वाढेल. सामाजिक संबंध दृढ होतील. आर्थिक व्यवहारात सावधगिरीने निर्णय घ्या. कुटुंबात गोडवा राहील. प्रेमात सुसंवाद वाढेल. नोकरीत मान मिळेल. प्रवासासाठी योग आहे. आरोग्य सामान्य राहील. गुऊवारी शुभ कार्यांसाठी योग्य काळ.

उपाय : बदाम  मंदिरात दान द्या

वृश्चिक

तब्येतीच्या बाबतीत सावधान राहण्यातच शहाणपण आहे. राहूच्या प्रभावामुळे भाग्यात अचानक बदल घडू शकतो. आर्थिक बाबींत सावधगिरीने पाऊल उचलायला हवे. कामात धैर्याने पुढे चला. प्रेमात संवाद आवश्यक. कुटुंबात सौहार्द टिकेल.  मित्रांच्या मदतीने सुधारणा होईल. धार्मिक कार्यात सहभाग घेऊ शकता. शनिवारी पूजा-उपासना लाभदायक.

उपाय : वटवृक्षाला पाणी टाका.

धनु

वाचा निर्मळ आणि कर्म सकारात्मक ठेवा, सगळ्या बाजूने फायदा दिसेल.  बुध व गुऊ यांच्या संयोगामुळे बुद्धिमत्ता वाढेल. शिक्षण व विचारक्षेत्रात यश. आर्थिक स्थिती संतुलित राहील. प्रवासाच्या संधी वाढतील. कुटुंबात आनंद राहील. आरोग्य सामान्य. प्रेमात गोडवा आणि सुसंवाद वाढेल. सामाजिक प्रतिष्ठा मिळेल. गुऊवारी ध्यान उपयुक्त ठरेल.

उपाय : हिरवा रंग टाळा

मकर

कर्म आज करा, फळ उशिरा का होईना पण निश्चितच मिळेल. शनी-गुऊ व श्र्रमयोगामुळे संयम व मेहनताचे द्योतक निर्माण होतील. व्यवसायात काही नव्या संधी मिळू शकतात. आर्थिक स्थैर्य राहील. कुटुंबात शांतता टिकेल. आरोग्यावर विशेष लक्ष आवश्यक. प्रेमात संयम ठेवा. प्रवास फायदेशीर ठरू शकतो. ध्यान व पूजा उपयुक्त ठरेल. मित्रपरिवारातून आधार मिळेल.

उपाय : धार्मिक अनुष्टान करा.

कुंभ

सहनशीलतेचा अंत पाहणाऱ्या घटना घडू शकतात. शनी-अशुभ योगामुळे स्वावलंबन वाढेल, पण संयमाची गरज राहील. नोकरीत किंवा व्यवसायात मान मिळेल. आर्थिक बाबी स्थिर. प्रेमात स्थैर्य आहे. सामाजिक कार्यात सहभाग लाभदायक ठरेल. गुऊवारी धार्मिक कार्य करण्यास योग्य.

उपाय : रात्री दूध पिऊ नका.

मीन

वरिष्ठ ग्रहांच्या संयोगामुळे आध्यात्मिकता व अंतर्मुखता वाढेल. जे कराल त्याच्या बाबतीत कुणाकडेही वाच्यता करू नका. आर्थिक बाबी सुलभ होऊ शकतात. कामात सहभागातून मान मिळेल. प्रेमात गोडवा वाढेल. कुटुंबात सौहार्द राहील. प्रवास करण्याचा योग. आरोग्यावर थोडी काळजी घेणे गरजेचे. ध्यान उपयुक्त. मित्रपरिवारातून मदत मिळेल.

उपाय : चौकोनी चांदीचा तुकडा कपाटात ठेवा.

Advertisement
Tags :

.