खजाना राशिभविष्य
बुधवार दि. 18 ते मंगळवार दि. 24 जून 2025 पर्यंत
अंकशास्त्राचा (NUMEROLOGY) व्यावहारिक उपयोग
या विषयावर लेखमाला लिहिण्याची गरजच काय? सरळ-साधे आयुष्य आहे, राशीफल वाचतो, दिवस जात आहेत, मग हा नवीन विषय कशाला? असे प्रश्न तुम्हाला पडत नसतील तरच पुढील लेख वाचा. हे कुतूहल आहे. रोजचे आयुष्य सोपे करण्याच्या उद्देशाने केलेला एक प्रयत्न आहे. अनंताकडे नसेना का, पण अज्ञाताकडे घेतलेली एक झेप आहे. तुम्हाला न्यूमरॉलॉजी शिकवण्याचा उद्देश नाही. पण या विषयाच्या अनुषंगाने आपले दैनंदिन आयुष्य कसे सोपे करता येईल, हे तुम्हाला कळावे. नावात बदल करून काय होते, तुमचा मोबाईल नंबर, घर नंबर, गाड्यांचा नंबर तुमच्या जीवनावर सकारात्मक/नकारात्मक परिणाम कसा घडवतो? आकड्यांकडे ‘आकडू’पणे न पाहता त्यांचा गर्भित मथितार्थ समजून घेण्याचा हा एक प्रयत्न समजा. हे सगळे समजून घेण्याआधी काही बेसिक गोष्टी समजून घेणे अत्यावश्यक आहे. हा लेख नमनाला घडाभर तेल नाही तर विषय प्रवेश आहे, असे समजा.
आपण सर्वजण संख्यांचा वापर रोजच्या आयुष्यात करत असतो. पण केवळ गणनेपुरत्या मर्यादित नसलेल्या या संख्यांचा एक सूक्ष्म आणि अदृश्य कंपनविश्वदेखील असतो. प्रत्येक संख्येचे विशिष्ट ऊर्जा क्षेत्र असते आणि ती संख्या विशिष्ट फ्रिक्वेन्सीवर कार्य करते. हे तत्त्व प्राचीन भारतीय अंकशास्त्र आणि पाश्चात्य न्यूमरॉलॉजीमध्ये मान्य करण्यात आले आहे. संख्या ही केवळ गणना नाही तर ती एक ऊर्जा आहे, असे मानले जाते. आपल्या जन्मतारखेतल्या प्रत्येक अंकांना विशिष्ट अर्थ, फ्रिक्वेन्सी आणि कंपन असते. उदाहरणार्थ, 1 या संख्येचा संबंध सूर्याशी आहे आणि ही संख्या आत्मविश्वास, नेतृत्व आणि सर्जनशीलतेचे प्रतीक मानली जाते. याची फ्रिक्वेन्सी ऊर्जावान आणि प्रेरणादायक असते. तसेच 2 ही संख्या चंद्राशी संबंधित असून तिचे कंपन सौम्य, भावनिक आणि समेटात्मक असते. प्रत्येक संख्येचे एक विशिष्ट न्ग्ंratग्दहत् rिलिहम्ब् गित्d असते.
उदाहरणार्थ :
संख्या 1 : आत्मविश्वास, प्रेरणा-उच्च कंपन
संख्या 2 : प्रेम, सौम्यपणा-मृदू कंपन
संख्या 3 : आनंद, अभिव्यक्ती-उत्साही कंपन
संख्या 4 : स्थैर्य, व्यवहारिकता-स्थिर कंपन
संख्या 5 : साहस, परिवर्तन-गतिमान कंपन
संख्या 6 : प्रेम, सेवा-प्रेमळ कंपन
संख्या 7 : आध्यात्म, तत्त्वचिंतन-सूक्ष्म कंपन
संख्या 8 : शक्ती, प्रतिष्ठा-बलशाली कंपन
संख्या 9 : दान, सेवाभाव-कऊणामय कंपन
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात या संख्यांचे कंपन त्यांच्या जन्मतारखेतून, नावाच्या संख्येतून आणि वेळोवेळी घडणाऱ्या घटनांमधून प्रभाव टाकत असतात. न्यूमरॉलॉजीमध्ये या फ्रिक्वेन्सीजचा अभ्यास करून व्यक्तीच्या जीवनात येणाऱ्या चढ-उतारांचे अनुमान लावता येते. आजकाल अनेक शास्त्रज्ञ आणि आध्यात्मिक तज्ञ असे मानतात की, संपूर्ण विश्व एक विशिष्ट फ्रिक्वेन्सीवर कार्य करते आणि संख्या या त्या कंपनशक्तीचे मूळ स्रोत आहेत. उदाहरणार्थ, 111, 222, 333 यासारख्या ‘एंजेल नंबर्स’ ना विशिष्ट फ्रिक्वेन्सी असल्याचे मानले जाते. ज्या विशिष्ट वेळी दिसल्यास त्या ऊर्जा बदलाचे संकेत असतात. हे कंपन केवळ मानसिक नाही, तर शारीरिक व आध्यात्मिक स्तरावरही परिणाम करतात. म्हणूनच घरात, ऑफिसमध्ये किंवा ध्यानधारणेत विशिष्ट संख्येचा उच्चार किंवा त्याच्याशी संबंधित वस्तू ठेवून त्या कंपनांचा लाभ घेता येतो. प्राचीन काळी ऋषी-मुनीदेखील मंत्रोच्चार करताना विशिष्ट संख्येचा जप करत असत. कारण त्या जपाचा कंपन विशिष्ट फ्रिक्वेन्सीला गाठून वातावरण शुद्ध करत असे. संपूर्ण विश्व हे ऊर्जेवर आधारलेले आहे. आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या, न दिसणाऱ्या सर्व गोष्टी या विशिष्ट ऊर्जेच्या स्वरूपात अस्तित्वात आहेत. विज्ञानाने सिद्ध केले आहे की, कोणतीही वस्तू जिवंत किंवा निर्जिवही काही प्रमाणात ऊर्जा आणि कंपन (व्हायब्र्रेशन) सोडत असते. ही ऊर्जेची लहरी विशिष्ट फ्रिक्वेन्सीवर कार्य करते. फ्रिक्वेन्सी म्हणजे कंपनांची वारंवारता, जी सेकंदामधील कंपनांच्या संख्येवर आधारित असते. फ्रिक्वेन्सी जितकी जास्त तितकी त्या गोष्टीचा कंपन स्तर उंच आणि सूक्ष्म असतो. आपण बोलतो तेव्हा, विचार करतो तेव्हा किंवा कुठलीही भावना व्यक्त करतो तेव्हा त्या प्रत्येक कृतीतून एक प्रकारची ऊर्जा निर्माण होते. ही ऊर्जा वातावरणात फ्रिक्वेन्सीच्या स्वरूपात प्रसारित होते. सकारात्मक विचार आणि भावना उच्च फ्रिक्वेन्सीची ऊर्जा निर्माण करतात, तर नकारात्मक भावना आणि राग, द्वेष, दु:ख यासारख्या भावनांमुळे कमी फ्रिक्वेन्सीची ऊर्जा तयार होते. म्हणूनच आध्यात्मिक साधना, ध्यान, प्रार्थना किंवा सकारात्मक जीवनशैली अंगिकारल्याने आपली ऊर्जास्थिती उंचावते आणि त्याचा परिणाम जीवनातील घडामोडींवर होत असतो. भौतिकशास्त्रात फ्रिक्वेन्सी आणि व्हायब्र्रेशन हे अतिशय महत्त्वाचे तत्त्व आहे. ध्वनीलहरी, प्रकाशलहरी किंवा विद्युतचुंबकीय लहरी या सर्व गोष्टी विशिष्ट फ्रिक्वेन्सीवर कार्य करतात. उदाहरणार्थ, एखादी वस्तू जर विशिष्ट फ्रिक्वेन्सीने कंपन करत असेल, तर तिच्याभोवती त्याच फ्रिक्वेन्सीचे ऊर्जाक्षेत्र तयार होते. अशाच प्रकारे आपले शरीर, मन आणि आत्मादेखील एका विशिष्ट फ्रिक्वेन्सीवर कार्य करतात. ही फ्रिक्वेन्सी जर अकारण खालावली, तर शरीराला त्रास होऊ शकतो, मानसिक ताण वाढू शकतो आणि नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते. योग, प्राणायाम, ध्यान आणि सकारात्मक जीवनशैली यांचा उपयोग करून आपण आपली फ्रिक्वेन्सी उंचावू शकतो. वैज्ञानिक दृष्टिकोनातून सांगायचे झाले, तर आपल्या मेंदूमध्ये सतत काही लहरी कार्यरत असतात. ज्या अल्फा, बिटा, गॅम्मा आणि थिटा फ्रिक्वेन्सीवर कार्य करतात. ध्यान किंवा प्रार्थनेच्या वेळी मेंदूतील अल्फा फ्रिक्वेन्सी वाढते, ज्यामुळे मन शांत होते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. ऊर्जा, फ्रिक्वेन्सी आणि व्हायब्र्रेशन यांचे परस्परसंबंध जड आणि सूक्ष्म जगतातला महत्त्वाचा भाग आहे. कोणत्याही व्यक्तीचा, वस्तूचा किंवा जागेचा एक विशिष्ट ऊर्जा स्तर असतो. तो ऊर्जा स्तर जितका सकारात्मक आणि उच्च फ्रिक्वेन्सीचा असेल, तितके आयुष्यात सौख्य, आनंद आणि आरोग्य टिकून राहते. म्हणूनच वेदांमध्येही सांगितले आहे की, ‘जसे मन: तसे विश्व’ म्हणजे आपण जसा विचार करतो, तशीच आपली ऊर्जास्फूर्ती आणि त्या अनुषंगाने जीवनातल्या घटना घडत जातात. म्हणून ऊर्जेचे भान ठेवणे, फ्रिक्वेन्सी सकारात्मक ठेवणे आणि उच्च व्हायब्र्रेशनकडे जाणे, हे प्रत्येकाच्या जीवनासाठी आवश्यक आहे.
मेष
या आठवड्यात केतू-मंगळ युती घडवून आणेल. धर्म, संतान आणि कार्यस्थळी संघर्ष यांना सामोरे जावे लागेल. पण लक्ष्मी राजयोगच्या मदतीने उच्च कार्यक्षेत्रात चांगली प्रगती मिळेल. गुंतवणुकीत संयम आवश्यक आहे. भावनिक संवाद सुधारण्यासाठी प्रयत्न करा. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या.
उपाय : मंदिरात तेल अर्पण करा.
वृषभ
व्यावसायिक भागीदारीत यश प्राप्त होईल. आत्मविश्वास कायम ठेवा. ग्रहस्थितीतील बदलामुळे कौटुंबिक व स्वास्थ्य समस्या संभवतात. पण लक्ष्मी राजयोग तुमच्यासाठी नफा आणि धनलाभाचे मार्ग खुले करतो. खर्च व आर्थिक व्यवस्थापनावर लक्ष ठेवा. कुटुंबातील मतभेद कमी होतील. नोकरीत नाम व प्रतिष्ठा वाढेल. सामाजिक कार्यात भाग घ्या.
उपाय : गरजूला जेवणासाठी शिधा द्या.
मिथुन
आरोग्य सुधारण्याची लक्षणे दिसतील. प्रॉपर्टी संबंधित निर्णय विचारपूर्वक घ्या. गुरु-आदित्य युतीच्या प्रभावामुळे आर्थिक लाभ, नवीन प्रोजेक्ट्स व पदोन्नतीच्या संधी निर्माण होतील. कुटुंबात आनंददायक वातावरण राहील. उत्साहवर्धक योजना सुरू होतील. आरोग्य सामान्य राहील, परंतु मन:शांती महत्त्वाची. प्रवासासाठी योग्य कालखंड आहे. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.
उपाय : पांढरे कपडे वापरू नका.
कर्क
जुन्या मित्रांसोबत संपर्क घनिष्ठ होईल. मनात तणाव असू शकतो, पण मार्ग सापडतील. लक्ष्मी राजयोग तुम्हाला आर्थिक फायद्याच्या दिशेने नेत आहे. कौटुंबिक वाद मिटतील व घरात सौहार्द टिकेल. प्रवासाचे योग आहेत. मानसिक शांततेसाठी ध्यान उपयुक्त ठरेल. नोकरीत संधी मिळेल. गुऊवारी शुभ योग आहे. आरोग्याकडे लक्ष ठेवा, पथ्ये पाळा.
उपाय : कोणतेही दान घेऊ नका.
सिंह
या काळात तुमच्या आर्थिक स्थितीत मोठी सुधारणा घडेल, तसेच सामाजिक प्रतिष्ठा मिळणार आहे. कोणत्यातरी प्रकल्पाला गती मिळेल. कुटुंबात आनंदसंध्या येतील. आरोग्य चांगले राहील. प्रेमसंबंधात गोडवा वाढेल. शेअरबाजार किंवा गुंतवणुकीसाठी उत्तम संधी दिसत आहे. वरिष्ठांकडून मान्यता मिळण्याची शक्मयता. चुकीच्या संगतीने नुकसान होईल.
उपाय : नशापाणी यापासून सक्त दूर रहा.
कन्या
नोकरीत मेहनत करावी लागणार आहे, पण सतत प्रयत्न कराल तर यश नक्की मिळेल. आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. कुटुंबात मतभेद असतील तरी संवादाने तोटा होणार नाही. आर्थिक परिस्थिती सुधारत जाईल. जुन्या समस्या मिटतील. प्रेमसंबंधांमध्ये समाधान राहील. रोजच्या जीवनात नातेसंबंधांकडे दुर्लक्ष होणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल.
उपाय : मासे खाऊ नका.
तूळ
आध्यात्मिकतेकडे आकर्षण वाढेल आणि नोकरीत चांगली कामगिरी होईल. आर्थिक स्थैर्य वाढणार आहे. भागीदारी योजनांना गती मिळेल. मित्रपरिवारातून मदत मिळेल. आरोग्य सामान्य राहील. सामाजिक कार्यात सहभागी व्हा. गृहसौख्यावर लक्ष द्या. मुलांकडून आधार मिळेल. प्रवासाचे योग आहेत, पण या प्रवासात फालतू गोष्टींवर खर्च जास्त होण्याची शक्मयता आहे.
उपाय : मंदिरात जाण्याचा परिपाठ ठेवा.
वृश्चिक
समस्या सोडवण्यात यश मिळेल, आर्थिक स्थिती सुधारेल आणि संबंध दृढ होतील. कोणत्यातरी प्रकल्पातून फायदा होईल. प्रवास करा, पण सावधगिरी बाळगा. आरोग्याचे संतुलन जपणे आवश्यक आहे. कौटुंबिक वातावरण शांत राहील. प्रेमसंबंध सुधारतील. गुंतवणूक करताना संयम ठेवा. लहान भावाबरोबर किंवा बहिणीबरोबर विनाकारण वाद होईल.
उपाय : रात्री दूध पिण्याचे टाळा.
धनु
कामात व्यस्तता वाढेल आणि लक्ष्मी राजयोगाचा परिणाम म्हणून आर्थिक फायद्याची शक्मयता राहील. करिअरमध्ये अढळ प्रतिष्ठा मिळेल. प्रेमसंबंध गोड होतील. प्रवासाचे योग अनुकूल आहेत. आरोग्य चांगले राहील. जुन्या प्रोजेक्टमध्ये यश मिळेल. मित्रांकडून आधार मिळेल. कामाच्या ठिकाणी आपल्या तोंडून चुकीचे शब्द निघणार नाहीत, याची दक्षता घ्यावी लागेल.
उपाय : तुरटीने दात साफ करा.
मकर
निर्णय घेताना सावध रहाण्याची गरज आहे, परंतु व्यावसायिक संधी तुम्ही ओळखू शकता. आर्थिक स्थैर्य आहे पण खर्चावर लक्ष ठेवा. कामात नवीन दिशा मिळेल. आरोग्यावर लक्ष द्या. घरातील वातावरण शांत राहील. प्रेमसंबंधात मधुरता वाढेल. नोकरीत मान्यता मिळण्याची शक्मयता आहे. तुम्ही जे कराल त्यात घरच्या लोकांचा सहभाग असावा, याची काळजी घ्या.
उपाय : दम्याची औषधे गरजूंना द्या.
कुंभ
पदोन्नती आणि आर्थिक लाभ या आठवड्यात शक्मयवत आहेत. कारण लक्ष्मी राजयोगचा लाभ तुमच्यावर आहे. नोकरीत उच्च स्थिती मिळेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. आरोग्य सामान्य राहील. नवीन प्रोजेक्ट ज्या दिशेने जातात ती तुमच्यासाठी उत्तम ठरेल. कुटुंबात सौहार्द राहील. प्रवासाचा विचार करा पण आपले बजेट सांभाळून. दाताचे दुखणे सताऊ शकते.
उपाय : तीर्थयात्रा करा.
मीन
मेहनती मार्गाने प्रगती साधावी लागेल आणि संयमाने तुम्हाला यश प्राप्त होईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. कुटुंबात शांतता राहील. आरोग्यावर लक्ष ठेवा. आध्यात्मिक कार्यात रस वाढेल. जुनी अडचण सुटेल. प्रेमसंबंधात गोडवा येईल. आर्थिक बाबतीत निष्काळजीपणे केलेली चूक पुढे जाऊन मोठ्या नुकसानीला कारणीभूत ठरू शकते. सावध रहा.
उपाय : तांब्याचा पैसा गळ्यात घाला.